सूर्यास्त..!
सोनेरी संध्याकाळी...
निसर्गाचा सुंदर नजराणा...
आपण त्याच्या अंगा खांद्यावर खेळणारे इवलेसे..
तो सर्वव्यापी...
आपण पहावं, डोळ्यांत साचवावं..
पर्वताची रांग, निळसर छटा..
केशरी उधळण...
क्षणाक्षणाला सौंदर्याची पखरण करणारा मऊ भासणारा निसर्ग देवता..
ही किमया... राज्य त्याचंच...
आपण समजायचं मालकी आपलीच...
आनंद, ऊर्जा घेऊन परतायचं...
तो आहेच सोबत सदैव...
क्षण न क्षण पुन्हा पुन्हा यावा...
उद्याही तो भेटणारच आहे..
घेऊन येईल अजून काही रंग बरोबर...
तो हसेल..
डोळ्यांत काही स्वप्न देतं, सुख देईल...
तृप्त करेल...
हळूच झाडांच्या फांद्यातून येत
हात पुढे करेन..
त्याचा मखमली स्पर्श...
नवी अनुभूती असेल....!
- जयंत येलुलकर (अहमदनगर)