'या' पतसंस्थेमुळे सर्व सामान्यांना आर्थिक हातभार - पद्मश्री पोपटराव पवार

सचिन गायगोवे (अहमदनगर) - अकोळनेर येथील 'ध्येय निधी लि. अकोळनेर'चे नामकरण करून त्याचे रूपांतरण 'लक्ष्यवेध अर्बन को ऑप क्रे. सो. लि.' असे करण्यात आले. त्याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पद्मश्री पोपटराव पवार तसेच 'लक्ष्यवेध'चे चेअरमन निलेश फुंदे यांच्या हस्ते फीत कापून नामांकरण सोहळा पार पडला.

त्यानंतर अकोळनेर येथील संत दासगणू महाराज मंदिरात नामकरण सोहळ्याप्रसंगी आदर्श गाव हिवरे बाजारचे पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले, 'लक्ष्यवेध' नाव म्हणजे जसे अर्जुनास माशाचा डोळा उडवणे लक्ष्य होते तसे हे लक्ष्यवेध नाव ठेवून निलेश फुंदे यांनी सगळ्यांचे लक्ष्य वेधले आहे.

जिल्ह्यात १२ शाखा कार्यरत केल्या ही सोपी गोष्ट नाही. जिल्हा परिषद सदस्य राणी लंके म्हणाल्या, लक्ष्यवेध मधून गोरगरिबांना मदत व्हावी आणि अकोळणेर सारख्या गावात संस्था उभारून लोकांवर संस्थेने आणि संस्थेने लोकांवर जो विश्वास टाकला ही गोष्ट वाखाणण्याजोगी आहे.

आभार प्रदर्शन लक्ष्यवेधचे चेअमन निलेश फुंदे यांनी मानले. याप्रसंगी राणी निलेश लंके (जि. प सदस्य) नगराध्यक्ष विजय औटी, भोरवाडी सरपंच भास्कर भोर, चास उपसरपंच युवराज कार्ले, अकोळणेरचे युवा सरपंच प्रतीक शेळके, उपस्थित होते.

जिल्हा बँकेचे मॅनेजर बाळासाहेब शेळके, अविनाश जाधव, उपसरपंच वंदनात गायकवाड, मार्केट कमिटी सदस्य बाळासाहेब जाधव, भगवान भोर, समाजसेविका विद्या भोर, मेजर मंगेश ठानगे, लक्ष्यवेधचे सि. ई. ओ. महेश भोर, ब्रांच मॅनेजर प्रतीक भोर व सर्व कर्मचारी वृंद कार्यक्रमास उपस्थित होते.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !