योगिता सुर्यवंशी (MBP Live24) - 'मदार' हा मराठी चित्रपट एकविसाव्या पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये सध्या चर्चेत आहे. हा सिनेमा नगरमधील मास कम्युनिकेशन या विभागातील माजी विद्यार्थी मंगेश महादेव बदर यांनी दिग्दर्शन केलेले आहे.
यामध्ये प्रमुख भुमिकेत अमृता अग्रवाल, आदिनाथ जाधव आणि मिलिंद शिंदे हे कलाकार आहेत. यापैकी मिलिंद शिंदे वगळता यामध्ये सर्व नवखे कलाकार आहेत. हा चित्रपट दुष्काळ भागातील जीवनशैलीवर आधारित आहे.
दिग्दर्शक मंगेश बदर यांनी या चित्रपटात दुष्काळामधील पाण्याअभावी होणारे गावातील माणसांचे आणि प्राण्यांचे जीवन चित्रीत केलेले आहे. या चित्रपटाचे संगीत रोहित नागभिडे यांनी केलेले आहे. या सर्वांचा हा पहिला चित्रपट आहे.
इतर तांत्रिक साहाय्य - कॅमेरा - आकाश बनकर व अजय भालेराव, एडिटिंग विशाल सरोदे, सिंक साऊंड रेकॉर्डिंग - सतिश डाडस, साऊंड इंजिनिअर महेश नाईक, संगीत रोहित नागभीडे, कलर ग्रेडिंग - विशाल सरोदे, असोसिएट दिग्दर्शक - रोहिदास मिसाळ.
प्रॉडक्शन - मनोज बदर, करण पाडुळे, कला दिग्दर्शन - गोकुळ वाघमारे, श्रीकांत मुसळे, स्टील फोटोग्राफी - पल्लवी वागदारकर, वेशभूषा - शामल बदर, शीतल मिसाळ, असिस्टंट डिरेक्टर्स - अमोल वाघमारे, रहमान, लेखक व दिग्दर्शक - मंगेश महादेव बदर.
निर्मिती संस्था - मिलिंद शिंदे फर्म्स, निर्माता - मिलिंद शिंदे, मंगेश महादेव बदर, मच्छिंद्र धुमाळ. सिने रसिकांनी मोठ्या संख्येने हा सिनेमा पाहण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन दिग्दर्शक मंगेश बदर यांनी केले आहे.
मंगेश महादेव बदर यांचा जन्म करमाळा तालुक्यातील घोटी गावामध्ये शेतकरी कुटुंबात झाला. ते चित्रपट पाहण्यासाठी शाळा सोडून व्हिडिओ सेंटरमध्ये कामाला राहिले. सिनेमाचे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी घर सोडले. त्यांचा पुढचा प्रवासही अत्यंत खडतर होता. मात्र जिद्द आणि चिकाटीने त्यांनी या क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले.
मिलिंद शिंदे यांच्यासोबत 'रे राया' नावाच्या चित्रपटाचे असिस्टंट डिरेक्टर म्हणून मंगेश बदर यांनी काम केले. त्यांचे काम पाहून मिलिंद शिंदे प्रभावित झाले व त्यांना फिल्ममध्ये अभिनय करण्याचे आणि फिल्मसाठी सहनिर्माता म्हणून काम करण्याचे सहकार्य केले.