राम : एक माणूस (श्रीरामनवमी विशेष)

आज रामनवमी. राम एक आज्ञाधारक पुत्र, त्रास सोसून आज्ञापालन करणारा पुत्र आपला हा राम आहे ना तो मनुष्यस्वभावानुसार चुकतो. आणि त्या चुकांच्या शिक्षाही भोगतो. अर्थात राम चुकतो म्हणून त्याचं शौर्य, त्याचे सद्गुण कमी होत नाहीत.

केवटाच्या घरी जेवणारा, शबरीचा पाहुणचार स्विकारणारा, अहिल्येला तू पवित्रच आहेस म्हणून तिच्या हातून भोजन ग्रहण करणारा, वानरसेनाला आपलसं करणारा हा राम मला माणूस म्हणून माझा वाटतो.

तो आदर्श राजा होता, पण आदर्श पती नव्हता. सीतेला अग्निपरीक्षा करायला लावणारा, गर्भार पत्नीला लोकापवादासाठी वनात पाठवणारा राम आपलं माणूसपण दाखवतो. कारण जो चुका करतो तोच माणूस असतो ना..

आपण त्याला सत्यवचनी म्हणतो पण वाली-सुग्रीवाच्या लढाईत कपट करतो ते तो माणूस असतो म्हणून ना.. राम पराक्रमी, आदर्शवादी, प्रजेवर नितांत प्रेम करणारा राजा होता.. आपण सामान्य लोक या आदर्शवादावर प्रेम करतो आणि त्या व्यक्तिला देव घोषित करुन देव्हाऱ्यात बसवतो...

अन त्याचं माणूसपण हिरावून घेतो. माणूस फक्त काळा किंवा पांढरा नसतो तो चांगल्या वाईटाचे मिश्रण असतो. म्हणून तो माणूस असतो. कारण आयुष्यात फक्त काळं किंवा फक्त पांढरं नसतंच. कधी उच्च, कधी मध्यम, कधी सुक्ष्म, असं आयुष्य असतं. 

श्रीकृष्ण, जोतिबा, खंडोबा यांच्याबाबतीतही आपण हेच केलेलं आहे. राम मला माणूस म्हणून भावतो. माणूस म्हणून त्याच्याकडे पहाताना कठीण प्रसंगात आपल संतुलन ढळू न देणारा आपला माणूस म्हणून पहावं..! 

- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर).
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !