गोष्टी डिजिटल झाल्या म्हणून आंघोळ टळत नाही आणि अभ्यंगस्नानाएवढे महत्त्व अपडेट्सना येत नाही. मुळात स्नान करायचे असते ते मळ धुऊन काढण्यासाठी. स्नान करणे ही शारीरिक कृती असली तरी त्यानिमित्ताने मनाने शुचिर्भूत होणेही अपेक्षित असते.!
म्हणूनच डिजिटल युगातही आजची आई किंवा परोपकारी श्यामच्या आईचे महत्त्व कमी होत नाही. रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट नाती परोपकाराच्या स्पर्शातून निर्माण होतात.
स्मार्टफोनच्या टचस्क्रीनला केलेल्या स्पर्शातून फक्त ते यंत्र कार्यरत होते. पण माणुसकीचा स्पर्श अखिल जगताला पुरून उरतो. त्याची भाषा संपूर्ण जगात सारखीच असते. गुंतागुंतीवरचा जगभरातील जालीम इलाज सहजतेमध्ये दडलेला आहे.
सहज आणि निर्मळ मनाने उत्साहवर्धक वातावरणात जीवनव्यवहार करणे हेच खरं जगणं.! माणुसकीची निर्मळता आपल्यात यावी, हे जग सुंदर करण्यासाठी आपण आपल्या पातळीवर जितकं करता येईल ते करावं.. इतकी सहजता आपल्यात यावी. बस्स.! आणखी काय हवंय ना.?
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)
(सखीसंपदा परिवार)