हा व्हिडिओ पहा आणि आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा
(ॲड. उमेश अनपट) नाशिक : अभ्यास, सराव, परीक्षा, व्यायाम, खेळ याप्रमाणेच दरवर्षी होणारे वार्षिक स्नेहसंमेलन हा देखील शालेय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. या संस्कृतीची जपवणूक करण्यासाठी 'ज्ञान की रोशनी ' या टायटल अंतर्गत इंदिरानगर येथील सुदर्शन हॉल मध्ये बुधवारी सायंकाळी 5 वाजता ऑईस्टर इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात यशस्वीरीत्या पार पडले.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर, नगरसेवक अमोल जाधव, धावपटू तानाजी भोर आदी उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचा 'ऑईस्टर ' चे संस्थापक - संचालक मनप्रीतसिंग जोहर आणि प्रिन्सिपल अमोल रुपेकर यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.विद्यार्थ्यांचे मंत्रमुग्ध सादरीकरण : वेलकम साँग आणि गणेश वंदना यांनी सुरुवात झालेल्या या बहारदार कार्यक्रमात अनेक हिंदी आणि मराठी गीतांची रेलचेल होती. यात आय ॲम सो हॅप्पी.., टुकुर टूकुर..., आज है संडे.., छोटे छोटे तमाशे.., गलती से मिस्टेक.., सुनो घंटी बजी स्कूल की.., हम सुधरेंगे.., दुनिया का नारा जमे रहो तुम.., मॅथ साँग.., छडी लागे छम छम.., आदी साँग च्या तालावर ठेका धरत लहान - मोठ्या विद्यार्थ्यांनी सर्वाँना मंत्रमुग्ध केले.
गुणवंतांचा गौरव : चालू शैक्षणिक सत्रात विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या या यशस्वी कामगिरीचा विद्यार्थ्यांना पदके प्रदान करून गौरव करण्यात आला.
'युनिक ब्रेन अकॅडमी'चा वरचष्मा : सुर्यांश अनपट, प्रिया घावटे, समीक्षा शिरोडकर, मृदुल पाटील, विभव पवार आदी युनिक ब्रेन अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी जोरदार परफॉर्मन्स करत उपस्थितांची मने जिंकत या कार्यक्रमात आघाडी घेतली.
पालकांचा उत्साह गगनात : आपली मुलं स्टेजवर जाऊन परफॉर्मन्स करताना पाहून पालकांचा आनंद आभाळात सामावत नव्हता. आपला पाल्य स्टेजवर आला की पालक खुर्ची सोडून स्टेजकडे धावत. आपले मोबाईल काढून मुलांचा हा रंगीबेरंगी कला - गुणांचा सोहळा व्हिडिओ, फोटो च्या माध्यमातून या क्षणाची साठवण म्हणून टिपून ठेवत होते. या आनंदाच्या भरात पालक देखील या धकाधकीच्या जीवनाततील सर्व काही आव्हाने, त्रास विसरून लहान बनून संगीताच्या तालावर नकळत अंग हलवित होती. अशा प्रकारे 'याची देही याची डोळा ' या कार्यक्रमाचा मन भरून आनंद पालकांनी लुटला.
शिक्षकांवर स्तुती सुमने : मॅनेजमेंट स्टाफ आणि टीचर्स यांच्या एकत्रित प्रयत्नातून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. कार्यक्रमापूर्वी आठवडाभर आधीच विविध गाण्यांची निवड करून त्यावर विद्यार्थ्यांचे ग्रुप डान्स बसविण्यासाठी येथील सर्वच टीचर्स ने कमालीची मेहनत घेतली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज ती फलाळा आली. वेळेवर कार्यक्रम सुरू होऊन वेळेवर संपन्न झाला, यातून योग्य नियोजनाची झलक दिसून आली. या आगळयावेगळ्या सोहळ्याच्या यशस्वी नियोजनाची पालक वर्गातून तोंड भरून स्तुती करण्यात आली.