गूढ मृत्यु ? : 'ऍक्शन टेकन रिपोर्ट' सादर करा, नाशिक तालुका पोलिसांना न्यायालयाचे आदेश

आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा

नाशिक : आदित्य विजय शार्दूल या अल्पवयीन मुलाच्या संशयास्पद मृत्यु प्रकरणी आपण काय कार्यवाही केली, याबाबतचा 'ऍक्शन टेकन रिपोर्ट' सादर करण्याचे आदेश नाशिक तालुका पोलिसांना येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने दिले आहेत. 


मयत आदित्य शार्दूल याचा संशयास्पद मृत्यु झाल्याचा आरोप करत याचा सखोल तपास व्हावा, या मागणीचा अर्ज आदित्यची आई पुष्पा विजय शार्दूल यांनी ऍड. मोहसीन सय्यद यांच्या मार्फत येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल केला आहे.

अर्जाद्वारे न्यायाची याचना : अर्जात म्हटले आहे, की 6 एप्रिल रोजी मयत आदित्य ला 6 समवयस्क मुलांनी गंगापूर परिसरातील महादेव पूल, गोवर्धन शिवार या ठिकाणी नेले होते. यानंतर मात्र त्याच्या एका मित्राने शार्दूलला बारदान फाट्यावरील ध्रुव नगर मधील मोतीवाला हॉस्पिटलमध्ये नेल्याचे फोनवर सांगितले. तसेच त्यास तेथून जिल्हा रुग्णालयात घेऊन गेले. यानंतर आदित्यची आई, भाऊ पोहचले तेंव्हा त्याचा पाण्यात पोहताना बुडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यांनी मृतदेह पाहिला त्यावेळी त्याच्या गालाला जखम होती. त्यातून रक्त येत होते. तसेच त्याच्या पायाची कातडी निघून हाड दिसत होती. त्यामुळे त्याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला.


पोलीस अधीक्षकांकडेही मागितली दाद : आदित्यचा संशयास्पद मृत्यू झाला असून या प्रकणाचे गूढ उकलून काढून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी , या मागणीचा  लेखी अर्ज पुष्पा शार्दूल यांनी नाशिक पोलीस ठाण्यात, तसेच नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे देखील केला आहे. मात्र त्यावर पोलिसांनी कुठलीही कार्यवाही केली नसल्याचा आरोप करत थेट न्यायालयात दाद मागितली.

या अर्जावर नुकतीच  31 जुलै रोजी येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी ऍड. मोहसीन सय्यद यांनी फिर्यादी पुष्पा शार्दूल यांच्या वतीने बाजू मांडली. सदर प्रकरणात फिर्यादी यांनी उपस्थित केलेल्या संशयास्पद बाबींच्या आधारावर सखोल पोलीस तपास होऊन सत्य समोर येण्याची गरज असल्याचा युक्तीवाद केला. त्यानुसार  या प्रकरणाचा 'एक्शन टेकन रिपोर्ट' सादर करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.

आदेशात काय म्हटलंय ? : फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात येऊन दिलेल्या माहिती नंतर आपण त्याबाबत काय कार्यवाही केली किंवा काय तपास केला? याबाबतचा 'एक्शन टेकन रिपोर्ट' न्यायालयात सादर करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !