भारीच ! पहिला 'सिंघम' पुन्हा येतोय.. तेरा वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर.!


दिग्दर्शक रोहित शेट्टीचा आगामी चित्रपट 'सिंघम अगेन' प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. अशा परिस्थितीत आता चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे.

आता यंदाच्या दिवाळीला 'सिंघम अगेन' प्रदर्शित होणार असला, तरी त्याच्या आधी पहिला भाग, म्हणजेच तेरा वर्षांपूर्वीचा 'सिंघम' पुन्हा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

रोहित शेट्टीने सन २०११ मध्ये 'कॉप युनिव्हर्स' चित्रपटांची सुरुवात केली. त्याचा पहिला भाग होता 'सिंघम'. अजय देवगणने या चित्रपटात बाजीराव सिंघमची भूमिका करून खळबळ उडवून दिली होती.

आता 'सिंघम अगेन' पूर्वी सिंघम पुन्हा एकदा रिलीज होणार आहे. या सिनेमाचा निर्माता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अजय देवगण यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे.

त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'आम्ही सर्व शक्तीनिशी दिवाळीला येण्यापूर्वी हे सर्व पुन्हा कसे सुरू झाले याचा अनुभव घ्या. पुन्हा एकदा 'सिंघम अगेन'च्या आधी, पुन्हा एकदा 'सिंघम'चा अनुभव घ्या १८ ऑक्टोबरला!'

तर निर्मात्यांनी सांगितले आहे की, 'लोकांची प्रचंड मागणी होती. म्हणून सिंघम पुन्हा रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना पुन्हा एकदा अॅक्शन, इंटेंस परफॉर्मन्स आणि आयकॉनिक संवाद पुन्हा जिवंत करण्याची संधी मिळेल.'

या चित्रपटात अजय देवगणसोबत काजल अग्रवाल, प्रकाश राज यांनी मुख्य भूमिका साकारली होती. तसेच, रोहित शेट्टीने दिग्दर्शन केले होते. हा चित्रपट येत्या १८ ऑक्टोबरला पुन्हा एकदा चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !