बाणेश्वर महाविद्यालयात नव्या शैक्षणिक प्रवासाला उत्साहपूर्ण सुरुवात


अहिल्यानगर – बाणेश्वर शिक्षण संस्थेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बुऱ्हानगर (अहिल्यानगर) येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) तर्फे पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात पार पडला.

मंगळवार, दि. 19 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. जाधव अध्यक्षस्थान लाभले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी विद्यार्थ्यांचे स्वागत सेल्फी पॉइंटच्या माध्यमातून करण्यात आले.

प्रा. डॉ. स्वाती वाघ यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विविध विभाग प्रमुखांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत विभागीय कामकाज, अभ्यासक्रमाची रचना, चालू सत्रे याची माहिती दिली.

तसेच महाविद्यालयातील पायाभूत सुविधा, शैक्षणिक कार्यक्रम, सहाय्यक सेवा, अभ्यासक्रमेतर उपक्रम आणि क्रीडा विभागाबाबत सविस्तर माहिती दिली. प्रवेशित विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. जाधव यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनाचा आनंद घेण्याचे, तसेच विविध उपक्रमांत उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. संस्थापक आ. शिवाजी कर्डिले व संचालक युवा नेते अक्षय कर्डिले यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मनिषा पुंडे यांनी केले, तर प्रा. पूनम राऊत यांनी आभार प्रदर्शन केले.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !