श्री बाणेश्वर महाविद्यालयात पर्यावरण संवर्धनावर मूल्य शिक्षण कार्यशाळा

येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा

अहिल्यानगर - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व श्री बाणेश्वर शिक्षण संस्थेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बुऱ्हाणनगर (Baneshwar College) यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत पर्यावरण संवर्धन या विषयावर आधारित एक दिवसीय जिल्हास्तरीय मूल्य शिक्षण कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पडली.

ही कार्यशाळा स्वयंसेवकांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. व्ही. एम. जाधव होते. पहिल्या सत्रात डॉ. शिवप्रसाद घालमे (सहाय्यक कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्र, अहिल्यानगर) यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विशद करत वृक्षारोपण (Tree Plantation), प्लास्टिकमुक्त जीवनशैली व कचरा व्यवस्थापन या विषयांवर मार्गदर्शन केले.

दुपारच्या सत्रात प्रा. दत्तात्रय वारकड यांनी पर्यावरण संरक्षण व वृक्षारोपणाची काळाची गरज यावर भर देत प्रत्येकाने आपल्या परिसरात झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचा संदेश दिला. तिसऱ्या सत्रात पर्यावरण संवर्धन विषयक माहितीपटाचे निरीक्षण, गटचर्चा (Group Discussion) व प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम झाला, ज्यामध्ये सर्व स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला.

चौथ्या सत्रात समारोप प्रसंगी उपस्थित स्वयंसेवकांना प्रमाणपत्रांचे (Certificate) वितरण करण्यात आले. सुनील चोरमुले (माजी सैनिक व कनिष्ठ सहाय्यक, सा. फु. पुणे उपकेंद्र), डॉ. आर. एच. शेख, डॉ. बी. एम. मुळे यांच्यासह जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यशाळेसाठी संस्थेचे अध्यक्ष व संचालक, अहमदनगर जिल्हा सहकारी बँक लि.चे अक्षय कर्डिले (Akshay Kardile) यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. स्वाती वाघ यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय प्रा. दिवटे डी. एस. यांनी करून दिला. आभारप्रदर्शन कार्यक्रम अधिकारी प्रा. सागर कोहक यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे सहकारी प्रा. राऊत पी. एस., प्रा. शिंदे आर. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इप्तीसाम पठाण यांनी केले. ही कार्यशाळा विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणारी ठरली.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !