येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
अहिल्यानगर : बुऱ्हाणनगर (Burhannagar) येथील श्री बाणेश्वर शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात (Baneshwar College) 'राष्ट्रीय विज्ञान दिन' (National Scince Day) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. "विज्ञानातील महिला: विकसित भारत उत्प्रेरक" या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणीव जागृती करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर सी.व्ही. रमन (Scientist CV Raman) यांच्या प्रतिमेस हार घालून करण्यात आली. प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या पोलीस अधीक्षक एपीआय कल्पना चव्हाण (API Kalpana Chavan) यांनी विद्यार्थ्यांना 'सेल्फ प्रोटेक्शन' (Self Protecton) आणि तंत्रज्ञानाच्या युगात विविध ॲप्सचे फायदे-तोटे सांगून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याचे मोलाचे मार्गदर्शन केले.
दुसरे प्रमुख पाहुणे, पाऊलबुद्धे कॉलेजचे प्राचार्य श्याम पंगा यांनी विज्ञानातील संधींविषयी माहिती दिली. १९३० चे नोबेल पारितोषिक (Nobel Prize) मिळवून देणाऱ्या 'रमन इफेक्ट'चा (Raman Effect) संदर्भ देत त्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि वैद्यकशास्त्र या क्षेत्रात संशोधनाच्या मोठ्या संधी असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून संशोधन चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.एम. जाधव यांनी "विज्ञानाची क्रांती, विज्ञानाची प्रगती, विज्ञानाचा नवा ध्यास! विज्ञानाने देशाचा विकास" हा संदेश देत विज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. याप्रसंगी संस्थेचे संचालक अक्षय कर्डिले (Akshay Kardile) यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
विज्ञानावर आधारित रांगोळी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध संदेश दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. स्वाती वाघ यांनी केले. यावेळी कला शाखा प्रमुख डॉ. बी.एम. मुळे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. आर.एच. शेख यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मनीषा पुंडे यांनी केले, तर आभार प्रा. माधुरी तिवारी यांनी मानले.

