येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
अहिल्यानगर - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि बुऱ्हाणनगर (Burhannagar) येथील श्री बाणेश्वर महाविद्यालयाच्या (Baneshwar College) संयुक्त विद्यमाने 'निर्भय कन्या अभियान' कार्यशाळा उत्साहात पार पडली. नगर शहर तालुका पोलीस स्टेशनच्या एपीआय कल्पना चव्हाण (API Kalpana Chavan) व निर्भया पथकाच्या हस्ते याचे उद्घाटन झाले.
एपीआय कल्पना चव्हाण यांनी मुलींना कायदेशीर हक्क (Legal Rights), स्वसंरक्षण (Self Defence) आणि सायबर गुन्ह्यांपासून (Cyber Crime) बचावाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी '११२' या हेल्पलाइन क्रमांकाचे महत्त्व सांगून आपत्कालीन प्रसंगी न घाबरता पोलिसांशी (Police Helpline) तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन सर्व विद्यार्थिनींना यावेळी केले.
निर्भया पथकातील पो.कॉ. संदीप थोरात, रिंकी महाडिक, प्रतिभा नागरे व यशोदा खाटीक यांनी विविध उदाहरणांतून मुलींना जागरूक केले. विद्यार्थिनींनी या सत्रात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या शंकांचे निरसन केले. यामुळे त्यांच्यातील आत्मविश्वास (Self Confidence) वाढण्यास मोठी मदत झाली.
दुसऱ्या सत्रात प्रा. डॉ. पुंडे यांनी स्वसंरक्षणाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक (Self Defence Practical) करून दाखवले. त्यांनी स्वतः कराटेचे तंत्र सादर करत विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे दिले. आपत्कालीन प्रसंगी धैर्य (Daring), संयम (Patience) आणि तत्परता (Presence of Mind) कशी राखावी, याचे मौल्यवान मार्गदर्शन त्यांनी केले.
बाणेश्वर संस्थेचे अध्यक्ष अक्षय कर्डिले (Akshay Kardile) यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी झाला. डॉ. पुंडे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. वाघ मॅडम यांनी पोलीस पथकाचे आभार मानले. या उपक्रमामुळे परिसरात महिला सुरक्षेबाबत (Women Sefty) मोठी जागरूकता निर्माण झाली आहे.

