'कॉर्पोरेट' आणि 'लव्ह जिहाद' विरोधात पुण्यातून एल्गार!

येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा

पुणे - "केवळ कॉर्पोरेट जिहादच (Corporate Jihad) नव्हे, तर जिथे संधी मिळेल तिथे भारताचे अस्तित्व पोखरण्याचे पद्धतशीर कारस्थान सुरू आहे. आपल्या तरुण पिढीच्या (Young Generation) विचारसरणीवर आणि धर्मावर होणारे हे आक्रमण चिंताजनक असून, या विरोधात मी आगामी काळात संसदेत आवाज उठवणार आहे. कॉर्पोरेट कंपन्यांसाठी (Corporate Sector) कठोर नियम आणि अटी लागू करण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करेल," असे ठाम प्रतिपादन भाजपच्या राज्यसभा खासदार (BJP MP) प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले.

हिंदू जनजागृती समितीच्या (Hindu Janjagruti Samiti) वतीने शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज (Modern College) ऑडिटोरियममध्ये आयोजित ‘बेटी सुरक्षित, राष्ट्र सुरक्षित’ अभियानाच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे आणि प्रसिद्ध लेखिका शेफाली वैद्य (Shefali Vaidya) उपस्थित होत्या.

कॉर्पोरेट क्षेत्रातील भेदाभेदावर प्रहार : कार्यक्रमात शेफाली वैद्य यांनी टीसीएस (नाशिक) (TCS Nashik) आणि लेन्सकार्ट (Lense Cart) सारख्या कंपन्यांच्या धोरणांवर कडक टीका केली. त्या म्हणाल्या, "अनेक कंपन्यांमध्ये हिजाब किंवा पगडी चालते, मात्र कुंकू, टिळा किंवा कलावा लावण्यास प्रतिबंध केला जातो.

हा उघडपणे हिंदूंशी केला जाणारा भेदभाव असून तो 'कॉर्पोरेट जिहाद'चाच भाग आहे. हिंदूंनी आपल्या धार्मिक अस्मितेसाठी संघटित होऊन अशा अन्यायकारक नियमांविरुद्ध आवाज उठवणे काळाची गरज आहे." हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे (Ramesh Shinde) यांनी 'गजवा-ए-हिंद' आणि 'व्हिजन २०४७' यांसारख्या धोक्यांचा उल्लेख करत उपस्थितांना सावध केले.

ते म्हणाले, लव्ह जिहाद (Love Jihad), लँड जिहाद (Land Jihad) आणि आता कॉर्पोरेट जिहादच्या माध्यमातून देशाचे इस्लामीकरण करण्याचे मनसुबे रचले जात आहेत. या संकटाचा सामना करण्यासाठी हिंदू समाजात 'स्वबोध' (स्वतःच्या धर्माचे ज्ञान) आणि 'शत्रुबोध' (धोक्याची जाणीव) असणे आवश्यक आहे. पालकांनी आपल्या पाल्यांशी संवाद वाढवून त्यांना धर्माचे श्रेष्ठत्व पटवून द्यावे.

पुणेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद : या कार्यक्रमाला कॉर्पोरेट क्षेत्रातील तरुण-तरुणींसह पुणेकर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या 'लव्ह जिहाद' आणि 'राष्ट्र-धर्म' विषयावरील ग्रंथ कक्षालाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

रणरागिणी शाखेच्या क्रांती पेटकर (Kranti Petkar) यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर 'वंदे मातरम्'ने (Vande Mataram) कार्यक्रमाची सांगता झाली. या अभियानाच्या प्रारंभामुळे हिंदू (Hindu) समाजात जनजागृतीची एक नवी लाट निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

येथे क्लिक करुन इंस्टाग्रामवर फॉलो करा

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !