आदरणीय राजर्षी शाहू महाराज (Rajarshi Shahu Maharaj) साहेबांनी सर्व क्षेत्रात सुधारणा, कायदे केले. वसतीगृहांचे जाळे असो, वा स्त्री उध्दाराचे कायदे असोत, सर्व वर्गांना सगळीकडे आपल्या करुणामयी हृदयाने न्याय देण्याचे काम केले आहे. यात अस्पृश्यांना ज्याकाळी माणूस सुद्धा समजले जात नव्हते त्याकाळी अस्पृश्यांना न्याय देण्यासाठी कृती केली आहे.
अस्पृश्यांना शाहू महाराजांनी जवळ घेतले. त्यांना आपल्या घोड्याच्या उघड्या खडखड्यात घेऊन गावात हिंडू लागले. मिरवणुकीच्या हत्तीचा माहुत त्यांनी अस्पृश्य ठेवला. त्याला सोन्याच्या अंबारीपुढे बसवले. अस्पृश्यांना मोटर ड्रायव्हिंगच्या कोर्सला पाठवून आपल्या महाराणी साहेबांच्या, चिरंजीव अक्कासाहेब व युवराज यांच्या मोटीवर मोटारीवर नेमले.
आपल्या पंक्तीत महार, मांग, चांभार, यांना बसवू लागले. काहींना दरबारात सरकारी अंगरखा, तलवार पट्टा, जरीचा फेटा देऊन सरकार मानकरांच्या रांगेत नेऊन बसवले. पट्टेवाले शिपाई, डगलेवाले पोलीस स्वतःचे शरीररक्षक (Bodyguards) सुद्धा त्यांनी अस्पृश्य नेमले.
थोडेसे शिक्षण झाल्यानंतर त्यांना मानाने कारकून आणि रजिस्ट्रीच्या रजिस्टरच्या जागा दिल्या. शाहू महाराजांच्या या अस्पृश्यधारक समाजकार्याचे स्फूर्तीदाते महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Fule) होते. खरंतर महात्मा फुले यांचा अस्पृश्य उद्धाराचा विचार शाहू महाराजांनी प्रत्यक्षात उतरवला.
एका संस्थानचा राजा यासाठी कायदे करू शकतो, वटहुकूम काढू शकतो, त्याची अंमलबजावणी डोळ्यात तेल घालून काटेकोरपणे करू शकतो, याचा महान आदर्श शाहू महाराजांनी चिरंतन रूपात भारतीय राज्यकर्त्यांपुढे ठेवला आहे.
माणगावच्या परिषदेत 1920 साली शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांची परिषदेत आलेल्या असंख्य दलित अस्पृश्य बांधवास, 'हाच तुमचा भावी नेता' अशी ओळख करून दिली. महाराजांची ही भविष्यवाणी डॉक्टर बाबासाहेबांचे दलितोध्दाराचे काम पाहिल्यानंतर खरी ठरल्याचे दिसून येते.
शाहू महाराजांचे त्यांचे समता प्रस्थापनेचे विधायक कार्याचे प्रत्यंतर म्हणजे त्यांच्या अस्पृश्य उध्दाराचे कार्याचे चिरंतन समाज स्मारक म्हणजे आजचा दलित समाज स्वहक्काबद्दलच्या जागृत झाला आहे. तो स्वाभिमानी झाला आहे, तो स्वयंप्रकाशित झाला आहे. याबरोबरच कार्यक्रमाचे याबरोबरच महाराजांनी फासेपारध्यांना सुद्धा माणसात आणले.
फासेपारधी ही भटकी जमात जंगलात फासे टाकून पक्षी ससे पकडावे, त्यावर आपला निर्वाह करावा, पण या निर्वाहाचे साधन अपुरे पडले की अवैध मार्गाने चोऱ्यामाऱ्या कराव्यात.
एकदा शाहू महाराजांनी एका पारध्याला विचारलं "अरे कशासाठी चोऱ्या करता दुसरा उद्योग धंदा नाही काय करत?" त्यांना पारध्यांनी उत्तर दिलं, "महाराज, आम्हाला कळते हे काम चांगलं नाही चोरी करणे पाप आहे. पण पोटात भुकेचा डोंब उसळला की डोकं फिरतं आणि मग जगण्यासाठी असली धडपड करतो."
महाराजांना त्यांच्या चोरी करण्याचे मूळ कारण सापडले, त्यांचे अंतकरण द्रवले. वीतभर पोटाचा वंन्ही प्रज्वलित झाला की अवैध मार्गाच्या भडका उडत जाणार हे त्यांना कळले. त्यांनी सर्व फासेपारध्यांना कुटुंबासह सोनतळीला आणले त्यांना घरटी शिधा देण्याची व्यवस्था केली.
समाजाने झिडकारलेल्या अनाथ दलित पासेपारध्यांचा आस्थेने कळकळीने विचार करणारे कृती करणारे हे शाहू महाराज एकमेवच..! फासेपारधी ही शूर काटक जमात. भारी विश्वासू, जीव गेला तरी विश्वासघात करणार नाही.
अशा या लोकांना माणसांचे जीवन जगता आले पाहिजे, हाच महाराजांचा विश्वास. या लोकांची गाडी कशी रुळावर आणायची, असा त्यांनी त्यांचाच विचार महाराज रात्रंदिवस करत होते. त्यांनी चोरांनाच पहारेकरी नेमण्याचा ठरवले.
सोनतळीवर कडेकोट पहारा बसवला. तो फासेपारध्यांचा फासेपारध्यांचा मुख्य प्रमुख असलेला लाल्या आणि आरवा या पाऱ्यावरील प्रमुख नाईक झाले, कांहींना नोकरीत घेतले. खाजगीतून शिधा जात होता. पण तो विनासायास मिळणारा शिधा होता, यामुळे लोकांना आईतखाऊ करणार आहोत महाराजांना हे बिलकुल मान्य नव्हते.
मग इतक्या लोकांना काय काम द्यायचे म्हणून त्यांनी बांधकामाची कॅम्पवर दगडांच्या कच्च्या विटांच्या छोट्या-मोठ्या साध्यासुध्या इमारती बांधण्याचे हुकूम देण्यात आले. फासे पारद्यांना लोक जवळ करायला तयार नसत. ते त्यांच्या चोरी करण्यामुळे.
म्हणूनच कुठेतरी दूर बांधकाम काढायचे आणि म्हणून त्यांनी सोनतळीवर बांधकाम काढले आणि त्यांना काम दिले. प्रेमाने जग जिंकता येते. प्रेमाच्या बळावर जंगली जानवरांनाही माणसाळता येतात. त्या प्रेमाच्या बळावर ती जंगली माणसेही माणसात आली पाहिजे, हा त्यांचा विश्वास दुःखी पीडित लोकांच्या आर्ततेने त्यांचे हृदय पिळवटून गेले निघत असेल.
अशा ह्या शाहूराजांनी फासेपारध्यांना पोटाशी धरले. आईच्या मायेने आपलेसे केले. रिकामे पोट आक्रमण करते. शेवटी बेभान होऊन गुन्हे करण्यास मागे पुढे पाहत नाही. यामुळे महाराजांनी फासेपारध्यांना रोजगार हमीची हमी दिली. ती बांधकामे काढूनच महाराजांनी त्यांच्यावर माया केली, पोटापाण्याची सोय केली.
पण महाराजांनी ती नेकीने वागतात, का त्यांच्या मूळ वळणावर जातात याची परीक्षाही बघितली. पण ते महाराजांच्या कसोटीवर उतरले. त्यांचे इमान अग्नीतून काढलेल्या सोन्याप्रमाणे विशुद्ध होते. आयुष्यभर या फासेपारध्यांनी महाराजांना साथ दिली.
गोड बोलणारी शहाणीसुरती अंतर अंतर्यामी स्वार्थी हेतूने ग्रस्त झालेली आणि इतरांना ग्रस्त करणारी खुषमस्करी करून मतलब साधणारी माणसे महाराजांच्या अवतीभवती होती. राजा असून महाराजांना या खुशमस्कऱ्यांचे वावडे होते. मतलबी लोकांची त्यांना चीड होती.
चाडी चुगली करण्याविषयी त्यांना तितकारा वाटत होता. ते चहाते होते ते सरळपणाचे. राजर्षी म्हणायचे, ही माणसं जनावरांच्या तांड्यात बसून राहतात, पण त्यांच्याजवळ लांडी लबाडी नाही. दिवसभर त्यांच्यात बसलो तरी मला कंटाळा येत नाही.
शुभ्र कपड्यांच्या आच्छादनाखाली दुष्ट कपटी काळेकुट्ट हृदय असण्यापेक्षा मलीन कपड्याखालचे विशुद्ध अंतकरण आणि अविचारी अवचलित निष्ठा मला पृथ्वी मोलाची वाटते. असे आपले राजर्षी मला अंतकरणाने बुध्दासारखे करुणामयी वाटतात. आज राजर्षींच्या जयंतीनिमित्त महाराज साहेबांना विनम्र आदरांजली.
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)
