फोटोग्राफी कला समृद्ध अन् ऐतिहासिक क्षणांची सोबती, नामवंत फोटोग्राफर्सचा सन्मान

येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा

अहिल्यानगर - "छायाचित्रण (Photography) ही एक अत्यंत समृद्ध कला असून टिपलेला प्रत्येक फोटो एका ऐतिहासिक क्षणाचा सोबती असतो. काळानुसार कितीही बदल झाले, तरी फोटोग्राफरचे स्थान आणि महत्त्व कायम अबाधित राहील," असे प्रतिपादन ज्येष्ठ छायाचित्रकार देवीप्रसाद अय्यंगार यांनी केले.

'ब्राह्मण बिझनेस नेटवर्क वेलफेअर असोसिएशन'तर्फे जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त (World Photography Day) अहिल्यानगरमधील नामवंत छायाचित्रकारांचा प्रातिनिधिक स्वरूपात विशेष सन्मान करण्यात आला. कॅमेरा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष चिन्मय सुखटणकर, अनिल शहा, संजय दळवी, सिद्धार्थ दीक्षित, राहुल विळदकर, मंदार साबळे, हितेन ओबेरॉय, ओंकार बेद्रे, आनंद विभूती आणि बद्रीनाथ महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

अनुभव, आठवणी आणि आव्हानांवर गप्पांचा फड : कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी प्रकट मुलाखतीद्वारे (Interactive Interview) आपल्या कारकिर्दीतील रंजक अनुभव मांडले. नगरमधील नरसू पुप्पाल, गुजराथी आणि शहा स्टुडिओच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. तसेच दत्ता खोजे, दत्ता इंगळे व जितेंद्र अग्रवाल यांना श्रद्धांजली वाहिली.

महत्त्वाचे विषय : ड्रोन कॅमेरा (Drone Camera), प्री-वेडिंग फोटोशूट (Pre-wedding Photoshoot), लातूरमधील पाण्याचे टिपलेले फोटो आणि वन्यजीव छायाचित्रणातील (Wildlife Photography) चित्तथरारक प्रसंगांवर मनमोकळी चर्चा झाली.

संस्थेची माहिती विश्वस्त निखिल कुलकर्णी यांनी दिली. स्नेहल धर्माधिकारी, श्रीपाद पुणतांबेकर, उमेश भालेराव, अपूर्वा काळे व वर्षा जोशी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर शैलेश राजगुरू यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हेमंत लोहगावकर, शिल्पा सोमणी, आसावरी नातू व मिलिंद कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.

येथे क्लिक करुन इंस्टाग्रामवर फॉलो करा

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !