अहमदनगर - जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये आज ७० व्यक्तींचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आले आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली आहे.
तसेच जिल्ह्यातील ५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. या रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता २६५ इतकी झाली आहे.
कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णामध्ये संगमनेर येथील ०३, पाथर्डी आणि पारनेर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली आहे.