मुंबई - कोरोनाच्या युद्धात फ्रंटलाईनवर लढताना आपला जीव गमावलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला असून संबंधित पोलिसांच्या निवृत्तीच्या तारखेपर्यंत त्यांच्या कुटुंबियांना शासकीय निवासस्थानात राहण्याची मुभा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतला आहे.
दिवंगत पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या डोक्यावरील छताची चिंता करू नये, शासन त्यांच्या पाठीशी उभी असल्याची ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.