‘कोरोना’च्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रेल्वे बोर्डाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या विशेष लोकल वगळता इतर उपनगरी लोकल वाहतूक 12 ऑगस्टपर्यंत बंद राहील.
जून अखेरपर्यंत केलेल्या आगाऊ तिकीट आरक्षणाचे संपूर्ण रिफंड देण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला होता. आता हा कालावधी एक जुलैपासून 12 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यानुसार ट्रेनचे आरक्षण केलेल्या प्रवाशांना तिकीटाचे 100 टक्के रिफंड दिले जाईल, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.