मुंबई - कोरोनामुळे खासगी रुग्णालये बंद असल्याने सामान्यांना वैद्यकीय सल्ला,आरोग्य तपासणीसाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवेचे मोबाईल ॲप तयार करण्यात आले आहे.
याआधी ही सेवा केवळ संगणक आधारित असल्याने त्याच्या वापरावर मर्यादा होत्या. आता ॲण्ड्राईड आधारित ॲप तयार झाल्याने त्याचा फायदा स्मार्ट फोन धारकांना घेता येईल. गुगल प्ले स्टोअरवरून हे ॲप डाऊनलोड करता येईल. दरम्यान, आतापर्यंत १६०० रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.