पुन्हा रंगणार भारत पाक युद्धाचा थरार

अजय देवगणच्या भुज द प्राईड ऑफ इंडियाचे नवे पोस्टर रिलीज

मनोरंजन - बॉलिवूड अभिनेता अजय देवगण ‘भूज द प्राइड ऑफ इंडिया' हा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज झाले आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रणामुळे हा चित्रपट सिनोगृहांऐवजी डिझनी हॉटस्टार या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यात अजय देवगणसोबत संजय दत्त आणि सोनाक्षी सिन्हा हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत.


सन १९७१ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धावर हा चित्रपट आधारित आहे. एका सत्य कथेवर हा चित्रपट आधारित आहे. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील माधापार गावातील 300 महिलांची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. भारताला युद्धात विजय मिळवून देण्यासाठी या महिलांनी दिलेले योगदान कथेतून मांडण्यात आले आहे. अजय देवगणने या चित्रपटात इंडियन एअर फोर्सच्या पायलटची भूमिका साकारली आहे. 

या चित्रपटामध्ये अजय स्क्वाड्रन लीडर विजय कर्णिक यांची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट येत्या १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. पण देशभरात सिनमेगृह बंद असाल्यामुळे आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा शौर्यावर आणखी चित्रपट बनवणे आवश्यक आहे, असे अजय देवगणने व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत सांगितले. 

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !