कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी आयडीबीआय बँकेची ४० लाखांची मदत

मुंबई - उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे आयडीबीआय बँकेच्यावतीने ४० लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्‍यात आला आहे. ही मदत पिंपरी-चिंचवड महापालिकेला कोरोनाविरुध्द लढ्यासाठी देण्यात आली आहे. 


इतर आवश्यक साहित्यही उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी आयडीबीआय बँकेचे अध्यक्ष रवी नारायणन, आयडीबीआयचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक संजय पणीकर तसेच विभागीय आयुक्त् ‍डॉ. दीपक म्‍हैसेकर, पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !