सानियाच्या चाहत्यांनी केलल्या ऑनलाईन व्होटिंगद्वारे सानियाला हा पुरस्कार मिळाला आहे. एकूण मतांपैकी 60 टक्के मत सानियाला पडली आहेत. फेड कप हार्टपुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय ठरल्याचा मला अभिमान आहे. मी हा पुरस्कार माझ्या देशवासियांना समर्पित करते, आणि माझ्या चाहत्यांचीही मी आभारी आहे. देशासाठी अशीच चांगली कामगिरी करत राहण्याचा माझा मानस आहे, असे सानियाने म्हटले आहे.
सानिया मिर्झा फेड कप हार्ट पुरस्काराची मानकरी
Friday, July 17, 2020
हैद्राबाद - भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाने प्रतिष्ठेचा फेड कप हार्ट पुरस्कार पटकावला आहे. हा पुरस्कार जिंकणारी सानिया पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. आशिया गटात सानिया मिर्झाने 10 हजारापेक्षा जास्त मत घेत या पुरस्कारावर आपली मोहर उमटवली आहे.
Tags