श्रावणातला पहिला सोमवार. सगळ्याच घरात हा सोमवार उपवास करतात. छान छान गोड किंवा तिखट रेसिपी असलेली उपवासाच्या बर्फीचेे रोल बनवून खाता येते. कामावर जाणाऱ्यांना पण टिफीन मध्ये तिखट गोड दोन्ही हवेसे वाटते. मग काय. कालच हे रोल बनवून ठेवले.
रेसिपीसाठी आवश्यक - अर्धा किलो खजुर, ५ ते ६ चमचे तूप, २ वाट्या ड्राय फ्रूट (आवडीप्रमाणे) घेऊ शकता. मी बदाम, आक्रोड, दाणे, डेसिकेटेड कोकोनट घेतले दाणे न घेता काजु, पिस्तेही घेऊ शकतो. तु
अशी बनवा रेसिपी - तव्यावर सर्व ड्राय फ्रूट टाकून थोडे बदामी रंगावर परतून घेणे. नंतर हे मिक्सर मध्ये जाडसर वाटून घ्यावे. खजुरात बिया असतील तर काढून, मिक्सर मध्ये फिरवून घ्यावे. उरलेल्या तुपात आता हे खजूर 7/8 मिनिटे परतवून घ्यावे. त्यातच ड्राय फ्रूट टाकून सर्व मिसळून घ्यावे...3/4 मिनिटांनी गॅस बंद करावा.
हेही करा - हाताने थापता येईल इतपत कोमट होऊ द्या. कोमट झाल्यावर परचमेंट पेपर किंवा अल्युमिनियम फॉईल वर ठेऊन रोल बनवून डेसिकेटेड कोकोनट त्यावर भुरभुरावे. गोलाकार झाल्यावर त्याच पेपरमधे गुंडाळून तो रोल फ्रिज मधे २ तास सेट करण्यास ठेवावे. दोन तासांनी काढून वड्या पाडाव्यात. इतर तिखट पदार्थांबरोबर सर्व्ह करावे. झाली तुमचे उपवासाचे रोल्स तयार !