‘दिल बेचारा’चा ट्रेलर प्रदर्शित

सिनेजगत - अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या शेवटच्या चित्रपट ‘दिल बेचारा’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये सुशांतसोबत संजना सांघीची मुख्य भूमिका आहे. मुख्य भूमिका असलेला हा तिचा पहिलाच चित्रपट आहे. लॉकडाउनमुळे निर्मात्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये सुशांतने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.


किझी आणि मॅनी या दोघांची ही प्रेमकहाणी आहे. किझी कॅन्सरग्रस्त आहे आणि मॅनीचं तिच्यावर खूप प्रेम आहे. मात्र ही सामान्य प्रेमकहाणी नाही. यात बरेच ट्विस्ट आहेत. संजनाचा हा पहिलाच चित्रपट असला तरी ट्रेलरमध्ये तिच्या दमदार अभिनयाची छाप पाहायला मिळते. “जन्म आणि मरण आपल्या हातात नाही पण कसं जगायचं हे आपल्या हातात आहे”, हा सुशांतचा संवाद मनाला खूप भिडतो.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !