बापरे ! अर्शद वारसीवर किडनी विकायची वेळ?

बॉलीवूड - राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच नागरिकांना आणखी एका गोष्टीने त्रस्त केलं आहे ते म्हणजे विजेचं बिल. कोरोनामुळे गेल्या तीन महिन्यांपासून अनेकांच्या हाताला काम नाही. अशा परिस्थितीत लोक कसंबसं संसार सांभाळण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यात बॉलिवूडमध्येही विविध कलाकारांना आपलं विजेचं बिल पाहून धास्ती भरली आहे.


अभिनेत्री तापसी पन्नू, रेणुका शहाणे यांच्यानंतर आता अभिनेता अर्शद वारसी याने विजेचं बिल भरण्यासाठी आपल्या पेंटिग्स विक्रीसाठी काढल्या आहेत. एका वृत्तपत्राशी बोलताना त्याने आपले अनुभव शेअर केले. त्याने चाहत्यांना पेंटिग्स विकत घेण्याची मागणी केली आहे. 

मला अदानीचं विजेचं बिल भरण्यासाठी पैशांची गरज असल्याने माझी पेंटिग्स खरेदी करा असं त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. माझ्या किडण्या मी पुढील बिलासाठी राखून ठेवत असल्याचेही त्याने या ट्विटमध्ये म्हटले आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !