यादरम्यान आणि एका घटनेची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री राणी चटर्जीने फेसबुकवर आत्महत्या करण्याबाबत पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. अभिनेत्री राणी चटर्जीने फेसबुकवर एका माणसासंबधित स्क्रीनशॉट शेअर केला आहे.
तिने लिहिले आहे की, हा माणून तिला गेल्या अनेक काळापासून त्रास देत आहे. हा इसम तिला शिव्या देत असल्याचंंही तिने नमूद केले आहे. अभद्र भाषा वापरत असल्याची तक्रार राणीने केली आहे. जेव्हा काही लोकं तिला या माणसाने लिहिलेल्या पोस्टचा स्क्रीनशॉट पाठवतात तेव्हा मला खूप दु:ख होते आणि त्यावेळी नैराश्य येते.' या इसमामुळे दीर्घकाळापासून आपण नैराश्याचा सामना करत असल्याचे राणीने म्हटले आहे.