मुंबई - परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील नागरिकांना ‘वंदेभारत’ अभियानांतर्गत मुंबईत उतरवून घेऊन त्यांना क्वारंटाईन कारण्याचे काम सातत्यपूर्ण रितीने सुरुच असून आतापर्यंत १८७ विमानांनी २८ हजार ९१६ नागरिक मुंबईत दाखल झाले आहेत.
यामध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या १० हजार ४४८ आहे, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या ९८६३ आहे तर इतर राज्यातील ८६०५ प्रवासी ही आतापर्यंत मुंबईत दाखल झाले आहेत.शासकीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे.