मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत:च झाले ड्रायव्हर, अन..

पुणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दुपारी एक दिवसीय दौऱ्यासाठी पुण्यामध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्या उपस्थितीत कोरोना संदर्भात आढावा बैठक होत आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरुन स्वतः गाडी चालवत सकाळी पुण्याच्या दिशेने रवाना झाले होते. 


दुपारी त्यांचे पुण्यात आगमन झाले. त्‍यांच्‍यासोबत पर्यावरण मंत्री आदित्‍य ठाकरे हेही होते. त्यांनी कोरोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधींसोबत तसेच प्रशासकीय यंत्रणेसमवेत आढावा आयोजित केली. 

यावेळी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप खासदार गिरीश बापट, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ हे सुद्धा उपस्थित आहेत. 

या बैठकीला सर्व प्रशासकीय प्रमुख अधिकारी हजर होते. मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दुपारी पुण्‍यात शासकीय विश्रामगृह येथे आगमन झाले. पुणे महसूल विभागाचे विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसकर आणि पुणे शहर पोलीस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम यांनी त्‍यांचे स्‍वागत केले. 
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !