सावधान ! फ्लॅट मालक आहात? 'या' चुका केल्यास अडचणीत याल..

येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा

नाशिक - फ्लॅट ओनरचे (Flat Owner) हक्क आणि कर्तव्ये या विषयावरील  सखोल आणि कायदेशीर माहिती सर्वसामान्य नागरिकांना समजेल अशा भाषेत प्रश्नोत्तराच्या स्वरूपात विधीतज्ञ अॅड. उमेश अनपट यांनी MBP Live24 च्या वाचकांसाठी दिली आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील सहकारी गृहनिर्माण संस्था कायदा, मॉडेल बाय-लॉज, RERA आदि मधील सामान्य नियमांचा आधार घेण्यात आला आहे.


फ्लॅट खरेदी केल्यावर मालकाला कोणते मूलभूत हक्क मिळतात?
  • आपल्या फ्लॅटमध्ये राहण्याचा
  • फ्लॅट वापरण्याचा पूर्ण अधिकार
  • फ्लॅट भाड्याने (Rent) देण्याचा अधिकार
  • सोसायटी मीटिंगमध्ये मत देण्याचा अधिकार
  • सोसायटी कागदपत्रांची माहिती मिळवण्याचा अधिकार
  • कॉमन एरिया (Commen Area) वापरण्याचा अधिकार
  • लिफ्ट (Lift), गार्डन (Garden) वापरण्याचा अधिकार
  • पार्किंग (Parking) वापरण्याचा अधिकार
  • आदि हक्क प्राप्त होतात असतात.

सोसायटीचे खाते, खर्च आणि निर्णयांची माहिती मागण्याचा अधिकार आहे का? : होय, फ्लॅट ओनरला ऑडिट रिपोर्ट, मेंटेनन्स खर्च, मीटिंग मिनिट्स, सोसायटीचे बाय-लॉज, आदि माहिती मागण्याचा कायदेशीर अधिकार आहे.

फ्लॅट ओनरने कोणती मूलभूत कर्तव्ये पाळली पाहिजेत?
  • वेळेवर मेंटेनन्स (Maintenance) भरणे
  • सोसायटीचे नियम (Society Rules) पाळणे
  • शेजाऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे
  • अनधिकृत बांधकाम (Illegal Construction) न करणे

फ्लॅट भाड्याने देण्यासाठी सोसायटीची परवानगी आवश्यक असते का?: सोसायटीच्या परवानगीची गरज नाही, पण भाडेकरूची माहिती सोसायटीला द्यावी लागते. त्याबरोबरच पोलिस व्हेरिफिकेशन आवश्यक असते. भाडेकरूची ही माहिती सोसायटीला देणे आवश्यक असते.

फ्लॅटमध्ये मोठे बदल (Renovation) करताना काय काळजी घ्यावी?
  • स्ट्रक्चरल बदल (Structural Changes) करण्यासाठी परवानगी आवश्यक
  • आवाजाचे नियम (Sound Limit) पाळणे
  • कामाची वेळ सोसायटीच्या नियमानुसार ठेवणे

सोसायटी पाळीव प्राणी ठेवण्यास बंदी घालू शकते का? : पूर्ण बंदी घालू शकत नाही. भारतातील नियमांनुसार पाळीव प्राणी ठेवणे हा मालकाचा हक्क आहे, मात्र, इतरांना त्रास होणार नाही याची जबाबदारी मालकाची असते.

पार्किंगचा हक्क काय असतो? : नियमांनुसार  पार्किंग सोसायटीची मालमत्ता असते. याचे वाटप सोसायटी करते. तसेच विकसक (बिल्डर) पार्किंग स्वतंत्र विकू शकत नाही. 

सोसायटी मनमानी दंड (Penalty) लावू शकते का? : नाही, कुठलाही दंड आकरताना तो दंड बाय-लॉज आणि कायदेशीर नियमांनुसारच असावा.  सोसायटीने मनमानी शुल्क आकरल्यास ते बेकायदेशीर ठरू शकते. त्यासाठी संबंधित सदस्य कायदेशीर दाद मागू शकतो.

मेंटेनन्स न भरल्यास काय होऊ शकते?
  • सोसायटी व्याज लावू शकते
  • कायदेशीर नोटीस देऊ शकते
  • को-ऑपरेटिव्ह कोर्टात केस करू शकते
  • भाडेकरूच्या वर्तनाची जबाबदारी कोणाची?
  • भाडेकरू नियम तोडल्यास मालकाला जबाबदार धरले जाऊ शकते
  • भाडेकरुवर नियंत्रण ठेवयाची जबाबदारी ही मालकाकडे येते. 
  • त्यामुळे भाडेकरूच्या वर्तनविषयीची जबाबदारी ही फ्लॅट ओनरची असते.

कॉमन एरिया वैयक्तिक वापरासाठी घेता येतो का? : नाही. कॉरिडॉर, टेरेस, गार्डन हे सर्व सदस्यांचे असतात. त्यांनी सर्वानी मिळून या जागेचा उपभोग घ्यायचा असतो. या जागांच्या ठिकाणी वैयक्तिक सामान ठेवणे नियमबाह्य ठरू शकते.

सोसायटी अन्याय करत असल्यास फ्लॅट ओनरने काय करावे?
  • लिखित तक्रार द्या
  • AGM मध्ये मुद्दा मांडा
  • सहकारी निबंधक कार्यालयात तक्रार
  • को-ऑपरेटिव्ह कोर्टात केस
बिल्डरकडून समस्या असल्यास कुठे जावे?
  • RERA प्राधिकरण
  • ग्राहक मंच
  • सिव्हिल कोर्ट
सोसायटी मीटिंगमध्ये सहभाग न घेतल्यास काय परिणाम होतात?
  • निर्णयांवर प्रभाव कमी होतो
  • महत्त्वाचे मुद्दे चुकू शकतात
  • नियमांवर मत देता येत नाही

महत्त्वाचा सल्ला : फ्लॅट ओनरने पुढील गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात. सोसायटीचे बाय-लॉज वाचून ठेवा, सर्व व्यवहार लिखित स्वरूपात करा, आर्थिक पारदर्शकतेची मागणी करा, कायदेशीर माहिती अपडेट ठेवा. त्यामुळे आपली फसवणूक अगर अन्याय होऊ शकत नाही. 

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !