जिल्ह्यात २४ तासात ३१६ नवे रुग्ण
अहमदनगर - जिल्ह्यात रविवार सायंकाळी ते सोमवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ३१६ नवे रूग्ण नोंदले गेले. पोलिस मुख्यालयात नेमणुकीस असलेल्या एका पोलिसाचा कोरोनामुळे मृृत्यू झा ल्यानंतर पोलिस मुख्यालयात तपासण्या करण्यात आल्या असता मुख्यालयात ११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हा रूग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १४२, अँटीजेन चाचणीत २५ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या १४९ रुग्णांचा समावेश आहे.
यामुळे उपचार सुरु असलेल्या एकूण रुग्णांची संख्या १४२५ इतकी झाली आहे. दरम्यान, आज तब्बल ३४० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या २२८५ झाली आहे. सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९७ रुग्ण आढळले होते. यामध्ये श्रीगोंदा (8), अकोले (12), अहमदनगर (14), नगर ग्रामीण (5), राहुरी (4), पाथर्डी (1), शेवगाव (2) राहाता (1), संगमनेर (30), भिंगार (19), पारनेर (1) आदी रुग्णांचा समावेश होता.
त्यानंतर त्यामध्ये आणखी ४५ रुग्णांची वाढ झाली. यामध्ये, पारनेर(2) - वाळवणे (1), सुपा (1), नगर - (8) निंबळक (1), कामरगाव (1), रुईछत्तीसी (1), वाळुंज (5), राहाता (3) - सावळीविहिर (1) पुणतांबा (2) पाथर्डी (1) - शंकरनगर (1) अहमदनगर शहर (31)- पोलीस हेड कॉर्टर (11), अहमदनगर (3), दातरंगेमळा (1), सारसनगर (3), कल्याण रोड (1), गुलमोहर रोड (2), कपिलेश्वर नगर (1), मूकुंदनगर (2) तारकपूर (1), सिव्हिल हडको सावेडी (1) पाईपलाईन रोड (5),
अँटीजेन चाचणीत आज राहाता येथील ०४, पाथर्डी १४ आणि कोपरगांव येथील ०७ जण असे २५ रुग्ण बाधित आढळले. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १४९ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ८७, नगर ग्रामीण १७, नेवासा ०१, पारनेर ०९, पाथर्डी ०२, राहाता ०७, राहुरी ०४, शेवगाव ०२,, कॅन्टोन्मेंट रोड ०३, संगमनेर ०८, कोपरगांव ०४ आणि श्रीरामपूर ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
उपचार सुरू असलेले रुग्ण - १४२५
बरे झालेले रुग्ण - २२८५
मृत्यू - ५३
एकूण रुग्ण संख्या - ३७६३
STAY HOME, STAY SAFE !
प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा
स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या
मास्क वापरा, स्वतःला सुरक्षित ठेवा