‘महाजॉब्स’ वेबपोर्टलचे लोकार्पण

मुंबई - राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या ‘महाजॉब्स’ या वेबपोर्टलचे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. तर कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे उपस्थित होते. 


मध्यंतरी कोरोना संसर्गामुळे कामगारांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे. हे कामगार परत कधी येतील, याची निश्चिती नव्हती, त्यामुळे उद्योगांना कामगाराचा तुटवडा भासू नये, तसेच स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी ‘महाजॉब्स’ हे वेबपोर्टल तयार केले आहे. याकामी उद्योग, कामगार व कौशल्य विकास विभागाच्या सूचना महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत. 

 रोजगाराच्या शोधात असलेल्या इच्छुकांनी केवळ आपली माहिती महाजॉब्स पोर्टलवर अपलोड करावी. एकदा नोंदणी केल्यानंतर विविध कंपन्यांकडून इच्छुकांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे अथक प्रयत्न व मार्गदर्शनाखाली अत्यल्प वेळेत हे पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलद्वारे स्थानिक बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !