अविनाश जाधव यांनी वसई येथील पालिका आयुक्तांच्या दालनात आंदोलन केले होते. विरारच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका बागडे यांनी अविनाश जाधव यांना खुलासा करण्यासाठी ४ ऑगस्टला विरारमधील कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. अविनाश जाधव यांना मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई आणि रायगड या पाच जिल्ह्यांमधून हद्दपार करण्यात आल्याची नोटीस दिलेली आहे.
अविनाश जाधव हे महापालिकेबाहेर कामावरुन काढलेल्या नर्सेससाठी आंदोलन करत होते. त्याच वेळी त्यांना नोटीस आली. त्यावर त्यांनी संतापा व्यक्त केला आहे. जाधव म्हणाले, मी आजपर्यंत कोणतेही आंदोलन स्वत:साठी केले नाही. वसईत जे आंदोलन केलं ते कोविड सेंटरसाठी होते. आजही विदर्भ, मराठवाडा, सांगली, सातारा येथून आलेल्या मुलींसाठी आंदोलन मी करतोय.