जूननंतर वीजबिले येण्यास सुरूवात झाली. मात्र वीजबिलाची रक्कम बघून अनेकांना झटका बसला आहे. या मुद्यावर सर्वसामान्यांपासून चित्रपट सृष्टीतील कलाकारांनीही आवाज उठवला. पण त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे वीजबिलाच्या मुद्यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: खमकी भूमिका घेत सरकारचे लक्ष वेधले आहे.
जून महिन्याची वीजबिले सामान्य माणसाचे डोळे पांढरे करणारी आहेत. मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांची सरासरी वीजबिले व त्या तीन महिन्यांत विजेचा झालेला वापर यात प्रचंड तफावत आहे, असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. खाजगी वीज कंपन्यांना देखील कडक शब्दांत समज द्यायला हवी अन्यथा ह्या खाजगी वीज कंपन्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.