चौहान म्हणाले, मी संपूर्णपणे कोरोना मार्गदर्शकाचे अनुसरणं करीत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी स्वत: कोरेन्टाईन करीन आणि उपचार घेईन. मी माझ्या राज्यातील लोकांना सावधगिरी बाळगा असे आवाहन करतो, थोडा निष्काळजीपणा सुद्धा कोरोनाला आमंत्रित करते.
कोरोनाबरोबर सावधगिरी बाळगण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न केला पण लोक अडचणीच्या वेळेस माझ्याशी भेटतच होते. मला भेटणार्या सर्वांना मी त्यांची चाचणी करण्याचा सल्ला देतो. कोरोनाला घाबरून जाण्याची गरज नाही. कोरोनावर वेळेवर उपचार केल्यास कोरोना बरा होतो, असेही त्यांनी म्हटले आहे.