सापडतोस माझ्या कवितांमध्ये..


श्रावणात उडणाऱ्या
पांढऱ्या ढगांचे थवेच्या थवे
हिरव्या डोंगर माथ्यावर उतरतात..

अन् पुन्हा उठून
नजरेआड होतात..
आणि असाच
श्रावण संपत जातो....
  
माझी नजर शोधत असते तुला 
पावसाच्या भिरभिरणा-या थेंबासारखी,
     
रात्रभर जागी असते 
तुला शोधत कधी..
कधी मात्र तू सापडतोस
माझ्या कवितांमध्ये...!!!
       
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर) ✍🏻
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !