कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यातच देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. नंतरही त्यात वेळोवेळी वाढ करण्यात आली. मे महिन्यात मात्र लॉकडाऊन शिथील करण्यात आले. परंतु, जूनमध्ये शाळा सुरु करण्यात पालकांसह सर्वच स्तरातून प्रचंड विरोध झाला. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरु करण्याचा पर्याय काढण्यात आला.
मात्र, अनेक विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणाची साधने उपलब्ध नसल्याने या पद्धतीवरही शंका व्यक्त करण्यात आली. आता मात्र कंटेनमेंट झोन बाहेर मेट्रो, सिनेमा हॉल, एंटरटेनमेंट पार्क, बार, ऑडिटोरियम, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, मनोरंजक आणि शैक्षणिक कार्यक्रमांव्यतिरिक्त इतर गोष्टींना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच नाइट कर्फ्यू हटवण्यात आला आहे.
कंटेनमेंट झोनमध्ये ३१ जुलैपर्यंत कडक लॉकडाउन लागू करावा, अशा सूचना राज्यांना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने कंटेनमेंट झोनबाबत विचारपूर्वक निर्णय घ्यावा. कंटेनमेंट झोनबद्दलची माहिती वेबसाइटवर दिली जाईल. फक्त अत्यावश्यक गोष्टींसाठी परवानगी असेल. राज्य सरकारने प्रत्येक गोष्टींवर बारील लक्ष ठेवावे. या झोनच्या दिशा निर्देशांचे काटेकोर पालन करावे, असे सांगण्यात आले आहे.