एकच लक्ष्य - मृत्यू दर शून्यावर आणणे

मुंबई - कोणत्याही परिस्थितीत गाफील न राहता मोठ्या प्रमाणावर तपासण्या करून कोरोनाचा मृत्यू दर शून्यावर आणणे हे एकमेव उद्दिष्ट आहे. यादृष्टीने विविध जिल्ह्यांमधील टास्क फोर्सच्या डॉक्टर्सनी मुंबईच्या राज्य टास्क फोर्सच्या डॉक्टरांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला व चर्चा केली, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. 


ठाकरे यांनी वैद्यकीय उपचार अधिक परिणामकारक होण्यासाठी राज्यातील सर्व टास्क फोर्सच्या डॉक्टरांची एकत्रित बैठक घेतली. त्यानंतर ते बोलत होतेे. कोरोना रुग्णांवर सर्व जिल्ह्यांमधून योग्य वैद्यकीय उपचार व्हावेत जेणेकरून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढेल तसेच मृत्यू दरदेखील झपाट्याने कमी होऊ शकेल असे ठाकरे म्हणाले. 

मृत्यू दर कमी नाही तर शून्यावर आणणे हेच आपले उद्दिष्ट असले पाहिजे, त्यादृष्टीने नेमके कशा रीतीने उपचार देण्यात येत आहेत तसेच त्या उपचारांमध्ये सर्व जिल्ह्यांत एकसूत्रीपणा आणि समानता असणे आवश्यक आहे आणि म्हणूनच जिल्ह्यांतील टास्क फोर्स आणि मुंबईतील टास्क फोर्सची एकत्रित बैठक आपण घेतली, असे त्यांनी सांगितले. 
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !