येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
टीम MBP Live24 - प्रभाग क्रमांक सहामध्ये गेल्या पाच वर्षांत रस्त्यांच्या कामांना (Development) वेग मिळाल्याने विकासाची गती वाढली आहे. तरीही येथे मूलभूत सुविधांचे (Basic Infrastructure) प्रश्न कायम असल्याचे चित्र समोर आले आहे.
उच्चभ्रू सोसायट्या, व्यावसायिक, कोचिंग सेंटर (Coaching Center), हॉस्पिटल्स (Hospital) आणि सततची वर्दळ असलेल्या या भागात स्वच्छतेची ढिलाई, अपुऱ्या गटारी, वारंवार बंद पडणाऱ्या ड्रेनेजलाइन यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक मोकळे भूखंड कचराकुंड्यांमध्ये रूपांतरित झाले असून नियमित कचरा संकलनाचा अभाव प्रकर्षाने जाणवतो.
प्रोफेसर चौकातील कचरा डेपो परिसरातील व्यावसायिक आणि रहिवाशांचेही मोठे हाल होत आहेत. कुष्ठधामकडे जाणाऱ्या मॉडेल रस्त्याची दुरवस्था कायम असून त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.
भिस्तबाग चौक (Bhistbag Chawk), मोरया मंगल कार्यालय (Morya Mangal Karyalay), सोनानगर चौक (Sonanagar Chawk), प्रोफेसर कॉलनी (Professor Colony), भगत मळा (Bhagat Mala), स्टेट बँक कॉलनी State Bank Colony), वेदांतनगर (Vedant Nagar), धनाजीनगर, डौले हॉस्पिटल (Daule Hospital) परिसर अशा विस्तृत भागाचा समावेश प्रभाग सहामध्ये येतो.
कॉलनीतील बहुतांश रस्ते सिमेंटचे झाले असले आणि पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागला असला तरी कचरा व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न अद्याप सोडवला गेलेला नाही. नागरिकांच्या मते, स्वच्छता व कचरा संकलनाबाबत महापालिकेने (Municipal Corporation) तातडीने ठोस उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.
- प्रभागातील समस्यांचा आढावा :
- कचरा डेपो-संबंधित समस्या
- प्रोफेसर चौकातील नाट्यसंकुलाजवळ असलेला कचरा डेपो नागरिकांसाठी मोठी त्रासदायक बाब.
- ट्रान्सफर स्टेशनचे अक्षरशः कचराकुंडीत रूपांतर.
- घंटागाड्या व कॉम्पॅक्टर वारंवार बंद पडल्याने कचरा दिवसातून दिवस साचून राहतो.
- पावसाळ्यात कचऱ्यातून प्रचंड दुर्गंधी; नागरिक त्रस्त.
- डेपो अन्यत्र हलवावा, अशी नागरिकांची मागणी.
- मोकळ्या भूखंडांची दुरवस्था :
- रासनेनगर (RasneNagar) डिझायनर सोसायटीतील मोकळा भूखंड उजाड; गवत, कचरा वाढला.
- पूर्वी तयार केलेली बाके व खेळणी नादुरुस्त; उद्यानाची सुविधा संपुष्टात.
- ड्रेनेज व स्वच्छतेचे प्रश्न :
- वैदुवाडीतील (Vaiduwadi) शिवकृपा सोसायटीत चेंबर लाइन वारंवार चोकअप.
- मैलामिश्रित पाणी बाहेर; गटारव्यवस्था अपुरी.
- तक्रारी असूनही महापालिकेचे सातत्याने दुर्लक्ष.
- रस्त्यांची दुरवस्था :
- तोफखाना पोलिस स्टेशन (Tofkhana Police Station)– भिस्तबाग चौक मार्गे जाणाऱ्या कुष्ठधाम रस्त्याची (Kushthadham Road) मोठी दुरवस्था
- मार्गी लागलेली कामे :
- बहुतांश अंतर्गत रस्ते व पाणीपुरवठा पूर्ण.
- पथदिवे व बहुतांशी ड्रेनेज कामे पूर्ण.
- काही मोकळ्या जागांचे सुशोभीकरण.
- नाट्यसंकुलाचे काम प्रगतीपथावर.
- प्रतीक्षेत असलेली कामे :
- कुष्ठधाम रस्त्याची तातडीची दुरुस्ती.
- मोकळ्या भूखंडांचे सुशोभीकरण.
- दर्जेदार उद्याने.
- कचरा संकलनाची नियमितता.
- नागरिकांचे म्हणणे :
- रासनेनगरमधील मोकळा भूखंड दुर्लक्षित; कचरा व गवत वाढले; उद्यानाची सुविधा नाही.
- शिवकृपा सोसायटीतील चेंबर लाइन वारंवार चोकअप; गटारींचा अभाव; प्रशासनाचे दुर्लक्ष.
