शेवगाव (अहिल्यानगर) - येथील पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कुलमधील रुणाल प्रजापती, सानवी ढाकणे व वैष्णवी मारकड या तीन खेळाडूंची जिल्हा खो खो असोसिएशनतर्फे (Kjo Kho Association) आयोजित 18 वर्ष वयोगट खो खो राज्य संघात निवड झाली आहे.
बुऱ्हानगर (Burhanagar) येथे डिसेंम्बरच्या (December) पहिल्या आठवड्यात होत असलेल्या राजस्तरीय (State Level) खो खो स्पर्धेत या खेळाडू प्रतिनिधित्व करणार आहेत. विभागीय स्पर्धेत शाळेच्या संघाने द्वितीय क्रमांक प्राप्त केला होता.
त्या संघात वरील तिघीनी केलेले उत्कृष्ट क्षेत्ररक्षण व आक्रमक बचाव, या जोरावर त्यांची निवड राज्य संघात झाली आहे, अशी माहिती त्याचे मार्गदर्शक क्रीडा शिक्षक सचिन शिरसाठ यांनी दिली आहे.
क्रीडा क्षेत्रातील शाळेची उज्ज्वल परंपरा कायम राखणाऱ्या या तिन्ही खेळाडूंचा प्रा. रमेश भारदे, हरीश भारदे व प्रा. संजय कुलकर्णी यांच्या हस्ते नुकताच सन्मान करण्यात आला. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
