अहिल्यानगरचं वॉर्डनिहाय वास्तव : ग्राऊंड रिपोर्ट (प्रभाग २ तपोवन, पाईपलाईन रोड)

 येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा

टीम MBP Live24 - मध्यमवर्गीय व्यावसायिक आणि नोकरदारांच्या वस्तीने ओळखला जाणारा प्रभाग क्रमांक दोन गेल्या पाच वर्षांत मूलभूत सुविधांच्या दृष्टीने बऱ्यापैकी विकसित झाला आहे. सोसायटी व कॉलनीमधील बहुतेक अंतर्गत सिमेंट रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत.

पथदिव्यांचीही व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे. लक्ष्मीनगरमधील मोठे उद्यान नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. निर्मलनगर (NirmalNagar) आणि पाइपलाइन रोड (Pipeline road) परिसरात दोन नवीन आरोग्य केंद्रे उभारली जात असून ड्रेनेज लाईनचा प्रश्नही मार्गी लागला आहे.

दृष्टीक्षेपात प्रभाग : (एकूण मतदार : २२४९५) डोकेनगर, पद्माकरनगर, हडको, मातोश्री मोटर, बहिणाबाई सोसायटी, दसरेनगर, नित्यसेवा बस स्टॉप, संभाजीनगर, नामदेवनगर, दत्तनगर, सिद्धेश्वर आया कॉलनी श्रीराम नगर, ऐश्वर्यानगर, लक्ष्मीनगर, अक्षता कॉलनी ज्ञानेश्वरनगर, श्रीकृष्ण नगर, संदेशनगर, साईदीपनगर.

नगररचना विभागाच्या त्रुटीपूर्ण कार्यपद्धतीमुळे प्रभागातील दोन महत्त्वाचे रस्ते रखडले आहेत. गावडे मळा (Gavade Mala) परिसरात रस्त्यालगत ओढा बंदिस्त करण्यासाठी टाकण्यात आलेल्या पाइपमुळे प्रवाहावर परिणाम झाला असून ओढ्यावरील अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

अमृत योजनेअंतर्गत निर्मलनगरमध्ये उभारलेल्या पाण्याच्या टाकीचे डिझाइन चुकीचे ठरल्याने मुख्य पाइपलाइनमधून पाणी पोहोचत नाही. त्यामुळे नव्या फेज-२ (Phase Two Scheme) जोडणी असूनही नागरिकांना पाणीपुरवठा सुरू होऊ शकलेला नाही.

हा प्रश्‍न सोडवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून (DPDC) ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून संपवेलचे काम प्रलंबित आहे. वेगाने विकसित होत असलेल्या या भागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्यास प्रभाग दोनचा सर्वांगीण विकास अधिक गती घेणार आहे.

  • नागरिकांच्या तक्रारी :
  • एकवीरा चौक – तपोवन रोड आणि सिटी प्राईड हॉटेल – शिरसाठ मळा रस्त्यांची कामे रखडलेली.
  • घंटागाडी नियमित येत नाही; कचरा संकलन अत्यंत अनियमित.
  • सफाई कामगार नियमित स्वच्छता करत नाहीत.
  • मोकाट कुत्री व जनावरांचा त्रास वाढला.
  • पोलिस कॉलनी, दत्तनगर, पाइपलाइन रोड येथे ड्रेनेजचे काम पूर्ण; पण अंतर्गत रस्ते अद्याप झालेले नाहीत.
  • फेज-२ पाइपलाइन सुरू नसल्याने पाणीटंचाई

  • मार्गी लागलेली कामे : 
  • मुख्य डीपी व अंतर्गत सिमेंट रस्ते पूर्ण.
  • ड्रेनेज लाइनची कामे पूर्ण.
  • चौक व मोकळ्या जागांचे सुशोभीकरण.
  • महिलांसाठी योगा हॉल.
  • आरोग्य केंद्र कार्यान्वित.
  • मंदिर परिसराचे सुशोभीकरण.

  • अद्याप प्रतीक्षेत असलेली कामे :
  • एकवीरा चौक (Ekvira Chawk) – तपोवन रोड (Tapowan Road).
  • सिटी प्राईड हॉटेल – पाऊलबुद्धे विद्यालय रस्ता.
  • गावडे मळ्यातील ओढ्यावरील अतिक्रमण.
  • निर्मलनगर फेज-२ पाणीपुरवठा सुरू नाही.
  • नव्या रस्त्यांवर पथदिवे नाहीत.
  • रस्त्यांची नियमित स्वच्छता व कचरा संकलन सुधारणे आवश्यक.

  • ओढ्याशी संबंधित समस्या : 
  • छत्रपती संभाजीनगर रोड – सूर्यनगर – निर्मलनगर मार्गे ओढा सीना नदीला मिळतो.
  • गावडे मळा व बालाजी कॉलनी परिसरात मोठे अतिक्रमण.
  • अनेक बांधकामांचे रेखांकन थेट ओढ्याच्या पात्रातच मंजूर.
  • पिंपळगाव रस्ता – ३ स्काय कोर्ट मागील भागात ओढा पाइपमध्ये बंद; पावसाळ्यात पुराचा धोका.

  • रस्ते रखडण्यामागील मुख्य कारण :
  • एकवीरा चौक – तपोवन रोड तसेच सिटी प्राईड – शिरसाट मळा रस्त्यांची रुंदी नकाशाप्रमाणे मोठी, पण प्रत्यक्षात बांधकामांमुळे अरुंद.
  • तत्कालीन नगररचना विभागाने चुकीची बांधकाम रेखांकने मंजूर केली.
  • आता रस्त्यांचे काम मंजूर असूनही नगररचना विभागाकडून मार्किंग न मिळाल्याने दोन्ही रस्त्यांची कामे रखडलेली.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !