मंदिरांच्या भूमींचे संरक्षणासाठी कडक कायदा लागू करा, ८० हून अधिक मंदिर विश्वस्तांची शासनाकडे मागणी


अहिल्यानगर - राज्यातील मंदिरांच्या देवस्थान (Hindu Temple) जमिनी भूमाफिया (Mafia) आणि काही महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमतातून बेकायदेशीरपणे हडप केल्या जात असल्याच्या उघडकीस येत असलेल्या प्रकारांविरोधात कठोर कायदा (Act) लागू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील ८० हून अधिक मंदिर विश्वस्तांनी (Temple Truste) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis)आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नावे निवेदन देत ‘अँटी लँड ग्रॅबिंग अ‍ॅक्ट’ (Anti Land Grabing Act) महाराष्ट्रात तात्काळ लागू करण्याची मागणी केली.

जिल्हाधिकारी, श्रीगोंदा तालुक्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुते (Vikramsinh Pachpute), विभागीय प्रांताधिकारी तसेच राहुरी (Rahuri), पाथर्डी (Pathardi), कर्जत (Karjat) आणि आष्टी (Aashti) येथील तहसीलदार यांच्या माध्यमातून हे निवेदन शासनाला पाठविण्यात आले.

देवस्थान जमिनी कायद्याने अहस्तांतरणीय असतानाही इनाम रजिस्टर आणि गाव नमुना ३ मध्ये फेरफार करून कोट्यवधींच्या जमिनी कवडीमोल भावात खाजगी व्यक्तींच्या नावे करण्यात आल्याचा आरोप विश्वस्तांनी केला.

गुजरात (Gujrat), कर्नाटक (Karnatak), आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) आणि आसाममध्ये (Aasam) जमीन बळकावणे हा फौजदारी गुन्हा मानणारा कडक कायदा अस्तित्वात असताना महाराष्ट्रात असा सक्षम कायदा नसल्याने भूमाफियांना ऊत येत असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे.

त्यामुळे जमीन हडप प्रकरणांना दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा घोषित करून विशेष तपास पथके (SIT) स्थापन करावीत, मागील २०-२५ वर्षांतील सर्व देवस्थान जमीन हस्तांतरण प्रकरणांची सखोल चौकशी करावी, तसेच प्रत्येक विभागात जलदगती न्यायालये (Fast Track Court) स्थापन करून खटले ६ महिन्यांत निकाली काढावेत, अशी ठोस मागणी विश्वस्तांनी केली.

‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ने विदर्भातील अनेक देवस्थानांची बळकावलेली जमीन पुनर्प्राप्त करण्यासाठी लढा दिल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने प्रेरित होऊन शासनाने मंदिर संपत्ती संरक्षणासाठी कठोर भूमिका घ्यावी, असे आवाहन विश्वस्तांच्या वतीने बापू ठाणगे (Bapu Thange) यांनी केले.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !