अहिल्यानगरचं वॉर्डनिहाय वास्तव : ग्राऊंड रिपोर्ट (प्रभाग १५ कल्याण रोड)

येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा

टीम MBP Live24 - प्रभाग क्रमांक १५ मधील नागरिक अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा, ड्रेनेज, रस्ते व स्वच्छतेसारख्या मूलभूत समस्यांमुळे त्रस्त आहेत. शहराच्या उत्तरेपासून कल्याण रोड बायपास (Kalyan Road Bypass) ते दक्षिणेला सीना नदी (Sina River) आणि रेल्वे स्टेशन परिसर (Railway Station) तसेच केडगावचा (Kedgaon) काही भाग या प्रभागात समाविष्ट आहे.

झोपडपट्टी (Slum Area), मध्यमवर्गीय (Middle Class) व उच्चभ्रू सोसायटीतील (High Profile) नागरिकांनी एकत्र येऊन समस्या मांडल्या. सांडपाणी वाहून नेण्याची ड्रेनेज लाईन नसल्याने अनेक घरांचे गाळ, कचरा आणि सांडपाणी मोकळ्या भूखंडात सोडले जात आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

अर्धवट पाइपलाइनमुळे पिण्याचे पाणी नियमित मिळत नाही, तर अनेक ठिकाणी रस्त्यांची स्थिती खड्डेमय आहे. पथदिवे (Street Lights) कधी चमकतात, याचा विश्वास नसल्याचे नागरिकांनी सांगितले. गटारींची सफाई वेळेत होत नसल्याने घरासमोरील रस्ते गटारीच्या पाण्याने खराब झाले आहेत.

तक्रारी केल्या तरी तत्कालीन नगरसेवक (Corporaters) व महापालिका (Municipal Corporation) प्रशासनाकडून पुरेशी कारवाई झाली नाही. नागरिकांनी प्रशासनाकडे प्रभागातील मूलभूत सुविधांचा जलद सुधार करण्याची मागणी केली आहे, अन्यथा परिसरातील समस्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली आहे.

काय म्हणतात नागरिक ?

  • पाणीपुरवठा आणि ड्रेनेज समस्या :
  • साईनगरमध्ये (Sainagar) पाणीपुरवठ्याची लाइन नाही; महापालिकेचे पाणी मिळत नाही.
  • ड्रेनेज लाइन नसल्यानं सांडपाणी मोकळ्या मैदानात सोडावे लागते, त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

  • रस्त्यांची दुरवस्था :
  • काही रस्ते चकाचक असले तरी अनेक ठिकाणी खोल खड्डे आहेत.
  • काटवन खंडोबा ते रेल्वे स्टेशन जाणारा आगरकर मळा मार्ग २५ वर्षांपासून रखडला आहे; अतिक्रमणांमुळे काम अडथळ्यात आले होते.
  • रस्त्याचे काम बहुतांश पूर्ण झाले असले तरी काही ठिकाणी पुन्हा ठप्प आहे; पावसाळ्यात हा मार्ग बंद होतो.

  • लोकप्रतिनिधींमध्ये तफावत :
  • एका प्रभागात चार नगरसेवक असून नागरिकांनी समस्या मांडल्या तरी ते जबाबदारी एकमेकांवर ढकलतात.
  • परिणामी अपेक्षित वेगाने विकासकामे (Devlopment) होत नाहीत.

  • साफसफाई व सार्वजनिक सुविधा :
  • संजननगर भागात स्वच्छता होत नाही, सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था आहे.
  • आगरकरमळा परिसरात पाणी नियमित मिळत नाही; बहुतांश वेळा दूषित पाणी येते.
  • नागरिकांसाठी मोठे उद्यान नाही; आहे त्या उद्यानाची स्वच्छता नियमित होत नाही.
  • अनेक ठिकाणी पथदिवे बंद आहेत.
  • लोखंडी पूल ते रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता रेल्वे स्टेशनसमोर अत्यंत खराब स्थितीत आहे.

या आहेत प्रमुख समस्या : 

  • मैलामिश्रित पाणी व ड्रेनेजची समस्या :
  • प्रभाग क्रमांक १५ मधील साईनगर आणि गाझीनगर परिसरात महापालिकेने अद्याप ड्रेनेज लाइन टाकलेली नाही.
  • घरातील सांडपाणी मोकळ्या मैदानात सोडावे लागते, त्यामुळे मैलामिश्रित पाणी साचले आहे.
  • यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
  • साईनगर भागात पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन आलेली नाही; नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागते.

  • सफाई व सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था :
  • संजयनगर झोपडपट्टीमध्ये कचरा संकलन वेळेवर होत नाही; घंटागाडी नियमित येत नाही.
  • पथदिवे अनेक वेळा बंद असतात.
  • नाल्यांची सफाई होत नाही.
  • सार्वजनिक शौचालये मोठ्या प्रमाणात खराब आहेत.

  • उच्चभ्रू सोसायटीतील समस्या :
  • आगरकर मळा परिसरातील सोसायटीत उद्यानांची नियमित स्वच्छता होत नाही; रात्री येथे तळीरामांचा अड्डा बनतो.
  • काही भागात रस्ते पक्के असले तरी बाकी रस्त्यांची दुरवस्था आहे.

  • इतर प्रभावित भाग : 
  • गाडळकर मळा, गायके मळा, आदर्श कॉलनी, रेल्वे स्टेशन परिसर, आनंदनगर, अर्बन बँक कॉलनी, बोहरी चाळ, कल्याण रोड परिसर, विद्या कॉलनी, बालाजी हौसिंग सोसायटी, दीप नगरकर, लाला नगर, भाजीनगर, वैष्णवनगर, लालानगर या भागांमध्ये रस्ते, पाणी व ड्रेनेजलाइनच्या समस्या आहेत.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !