शेवगाव (अहिल्यानगर) - पद्मभूषण बाळासाहेब भारदे स्मृती राज्यस्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा (Speech Competition) सांघिक फिरता करंडक यावर्षी राहुरी येथील सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) माध्यमिक विद्यालयाने पटकावला.
दि 22 रोजी भारदे हायस्कुलच्या रावसाहेब पटवर्धन सभागृहात कै. बाळासाहेब भारदे यांच्या स्मृतिदिनी या स्पर्धा संपन्न झाल्या.
या स्पर्धेत बीड (Beed), नांदेड (Nanded), सांगली (Sangali), संभाजीनगर (Sambhajinagar) यासह अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील शेवगाव (Shevgaon), पाथर्डी (Pathardi), नगर (Nagar), अकोले (Akole), राहुरी (Rahuri) येथून 60 विद्यार्थी सहभागी झाले.
मोठ्या गटाचे परीक्षण मुकुंद डांगे, महेश लाडने, राजू घुगरे यांनी तर लहान गटाचे परीक्षण पूनम राऊत, प्रदीप बोरुडे, सौरभ म्हाळस यांनी केले. प्रा. रमेश भारदे, हरीश भारदे व प्रा. संजय कुलकर्णी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण (Prize Distribution) करण्यात आले.
इयत्ता 7 वी ते 9 वी या गटात आर्या खराडे, राहुरी हिने प्रथम (5 हजार व स्मृतीचिन्ह) द्वितीय राजेश्वरी जाधव, राहुरी (3 हजार व स्मृतिचिन्ह) तृतीय नमिता सांगळे संगमनेर (2 हजार व स्मृतिचिन्ह), चतुर्थ प्रणव जाधव, सांगली (1 हजार व स्मृतीचिन्ह) तर संचिता अष्टेकर, नांदेड व तनुजा काळे, शहरटाकळी यांनी उत्तेजनार्थ बक्षिसे मिळवली.
चौथी ते सहावी या गटात प्रथम - सिद्धांत टोंगळे, नांदेड (३ हजार व स्मृतिचिन्ह), द्वितीय शरण्या करंडे, राहुरी (२ हजार व स्मृतिचिन्ह), तृतीय स्वानंदी सिन्नरकर राहुरी (१ हजार व स्मृतीचिन्ह), चतुर्थ उन्नती कोल्हे, संगमनेर (पाचशे रुपये, नांदेड) तर गोरक्षनाथ काकडे , चापडगाव व ज्ञानेश्वरी जीवडे, शहर टाकळी यांनी उत्तेजनार्थ बक्षिसे मिळवली.
या स्पर्धेचे सूत्रसंचालन निलेश मोरे यांनी केले. या स्पर्धेला विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ही स्पर्धा यशस्वी पार पडल्याबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
