अहिल्यानगरचं वॉर्डनिहाय वास्तव : ग्राऊंड रिपोर्ट (प्रभाग ४ मुकुंदनगर)

येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा

टीम MBP Live24 - मुकुंदनगर (Mukundnagar) परिसरात रस्त्यांची कामे ठप्प असून पाणीटंचाईसह नागरिक त्रस्त आहेत. या प्रभागातील रस्त्यांची चाळण सुरु असून, नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या दोन सिमेंट रस्त्यांचा मागील वर्षीच कार्यारंभ (Work Order) आदेश दिला गेला असला तरी अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही.

इतर अंतर्गत रस्त्यांची देखभालही प्रलंबित (Pending) असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परिसरात राहणाऱ्या सुमारे ५० हजार नागरिकांसाठी पाण्याची कृत्रिम टंचाईही (Drinking Water Problem) मोठी समस्या बनली आहे. फेज टू योजनेअंतर्गत (Phase Two Scheme) अनेक नागरिकांनी शुल्क भरून नळ कनेक्शन घेतले, तरी पाणी पूर्ण दाबाने मिळत नाही.

प्रभागाची व्याप्ती : दर्गादायरा, मुकुंदनगर, छोटी मरिअम मशीद, मिरज मशीद, डिस्ट्रिक बँक, वॉटर टैंक, दरबार चौक, मौलाना आझाद चौक, आएशा मशीद चौक, दानिश महल, इकरा एज्युकेशन सोसायटी, गोविंदपुरा, गौरवनगर.

बहुतांशी भागातील जुने पाईपलाइन नेटवर्कही (Water Pipeline) कार्यक्षम नसल्यामुळे पाण्याचा पुरवठा अडचणीचा आहे. नगरोत्थान योजनेअंतर्गत मुकुंदनगरातील ७०० मीटर लांबीचा सीआयव्ही सोसायटीचा मुख्य रस्ता आणि गोविंदपुरा नाका (Govindpura Naka) ते पोलिस कॉलनी (Police Colony) पर्यंतचा ५०० मीटर रस्ता मंजूर झाला आहे, परंतु राजकीय कारणांमुळे काम ठप्प आहे.

शहरातील इतर प्रकल्प पूर्णत्वास गेले असून मुकुंदनगरमधील काम रखडल्याची तक्रार (Complaint) नागरिकांकडून करण्यात आली आहे. पुढील पाच वर्षातील प्रभाग क्रमांक चारमध्ये रस्ते आणि पाणीपुरवठा सुधारण्याचे आश्वासन असून, नागरिकांनी प्रशासनाकडे कामे लवकर सुरु करण्याची मागणी केली आहे.

या आहेत नेमक्या समस्या :

  • पाणीपुरवठा समस्या :
  • मुकुंदनगरमधील दरबार चौक ते दर्गा दायरा परिसरात पूर्ण दाबाने पाणी मिळत नाही.
  • सहारा सिटीमध्ये पाणी पोहोचलेले नाही; नवीन लाइन सुरू झालेली नाही.

  • रस्त्यांची दुरवस्था :
  • वनविभाग ते दर्गा दायरा, फकीरवाडा ते दर्गा दायरा रस्ते खड्डे आणि खराब स्थितीत आहेत.
  • इशरत पार्क, अमान कॉलनी, मिलन कॉलनी, इकरा शाळा परिसर, गोविंदपुरा, मरियम मशीद परिसरातील रस्त्यांची दुरवस्था मोठ्या प्रमाणावर आहे.
  • सीआयव्ही हौसिंग सोसायटीचा मुख्य रस्ता व गोविंदपुरा नाका ते पोलिस चौकीपर्यंतचा रस्ता खराब स्थितीत आहे.

  • उद्यान आणि सार्वजनिक जागा :
  • प्रभागात एकही विकसित उद्यान नाही.
  • “माझी वसुंधरा” अभियानांतर्गत सीआयव्ही सोसायटीतील उद्यानासाठी निधी मंजूर झाला, पण काम अद्याप सुरू नाही.

  • मुलांसाठी खेळाच्या मैदानांची कमतरता :
  • प्रभागात मुलांसाठी कोणतेही मैदान नाही.
  • मोकळे भूखंड गवत आणि कचऱ्याने भरलेले आहेत.
  • सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता; अंतर्गत रस्त्यांची स्वच्छता होत नाही.

  • ज्येष्ठ नागरिक भवन :
  • काम सुरू केले होते, परंतु तेही ठप्प आहे.

  • पथदिव्यांची समस्या :
  • प्रभागातील बहुतांशी पथदिवे बंद आहेत.
  • नवीन पथदिव्यांची गरज आहे; अद्याप बसवलेले नाहीत.
  • दुरुस्ती करण्यासाठी मनपा नेमलेल्या ठेकेदाराकडे मोठा पाठपुरावा करावा लागतो.

या भागातील नागरिक काय म्हणतात ?

  • पाणीपुरवठा समस्या :
  • मुकुंदनगरमधील नागरिकांनी फेज टू योजनेत शुल्क भरून नळ कनेक्शन घेतले, तरी पाणी मिळत नाही.
  • जुन्या लाईनमधून देखील पुरेसे पाणी मिळत नाही.
  • टाकी घराजवळ असतानाही पाणी पुरेसे उपलब्ध होत नाही.

  • सफाई व्यवस्था अपुरी :
  • प्रभागात स्वच्छता नियमित होत नाही.
  • मुख्य रस्त्यावरही कचरा पडून राहतो.
  • कचरा संकलनासाठी घंटागाडी नियमित येत नाही.
  • रस्त्यांची दुरवस्था असून नागरिकांना अडचण येते.

  • निधी वाटपात भेदभाव :
  • शहरातील इतर भागात अनेक कामे मार्गी लागली आहेत, पण मुकुंदनगरमध्ये निधी वाटपात भेदभाव होतोय.
  • प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या भागातील मूलभूत सुविधा सुधारणे आवश्यक आहे.
  • नागरिकांनी प्रशासनाकडे विकासाची मागणी केली आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !