येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
अहिल्यानगर – लोणी (Loni) येथे खेलो इंडिया (Khelo India) उपक्रमांतर्गत मुलींसाठी आयोजित करण्यात आलेल्या अस्मिता ॲथलेटिक्स लीग (Asmita Atheletics Ligue) स्पर्धेचा थरार रंगणार आहे. जिल्ह्यातील विविध संस्था व मुलींना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धेचे आयोजन सोमवार, दि. 30 नोव्हेंबर 2025 रोजी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लोणी येथे करण्यात येणार आहे. स्पर्धा 14 वर्षांखालील व 16 वर्षांखालील दोन वयोगटांत मुलींसाठी होणार आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक मुलींनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष सुनील जाधव, सचिव दिनेश भालेराव व डॉ. उत्तम अनाप यांनी केले आहे.
या स्पर्धेचे आयोजन प्रवरा स्पोर्ट्स अकॅडमी आणि अहिल्यानगर जिल्हा अमॅच्युअर ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. विशेष म्हणजे, स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क (Free Cost) आकारले जाणार नाही. विजेत्या खेळाडूंना भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणामार्फत प्रमाणपत्रे (Certificate) व पदक (Medal) देण्यात येतील.
स्पर्धेदरम्यान भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशनद्वारे नियुक्त निवड पथक जिल्ह्याला भेट देऊन प्रतिभावान आणि भविष्यात उत्कृष्ट कामगिरी करू शकणाऱ्या खेळाडूंची निवड करणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खेळाडूंनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संदीप हारदे, श्रीरामसेतू आवारी, राहुल काळे, जगन गवांदे आणि अजित पवार प्रयत्नशील आहेत. अधिक माहिती संबंधित आयोजकांकडून उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सांगितले आहे.

