यापूर्वी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये डाऊनलोडमध्ये वाढ झालेली होती. फेब्रुवारीमध्ये ७% आणि मार्चमध्ये ८% वाढले. अहवालानुसार, ३.५५ कोटी वापरकर्त्यांनी मार्चमध्ये टिकटॉक अॅप डाऊनलोड केले. मार्चमध्ये हा आकडा घटून २.३५ कोटी झाला. मे महिन्या केवळ १.७ कोटी वापरकर्त्यांनी हे अॅप डाऊनलोड केले होते.
मागील काळात टिकटॉक व यूट्यूब क्रिएटरमध्ये झालेल्या वादाचा परिणाम टिकटॉकच्या लोकप्रियतेवर झाला आहे. तसेच मध्यंतरी भारत चीन सीमेवर भारतीय जवान शहीद झाल्यानंतर देशभरात चीनविरोधी वातावरण निर्माण झाले होते. तेव्हापाचूनच चीनी निर्मिती असलेल्या गोष्टींवर बंदी घालण्यची मागणी केली जात आहे. अनेकांनी स्वत:हून टिकटॉक काढून टाकले होते.