सावधान ! 'तुमचे व्हॉट्स अॅप चॅट कुणीतरी वाचतंय..

ब्युरो रिपोर्ट - 'तुमचे व्हॉट्सअॅप चॅट कुणीतरी वाचतंय!' हे शब्द तुमच्या कानावर गेल्या आठवड्याभरात पडले असतीलच. कारण एका छुप्या सॉफ्टवेअरचा वापर करून काही लोक तुमच्या फोनमध्ये डोकावू पाहतायत, अशी कबुली व्हॉट्सअॅपने दिली आहे. कारण स्पायवेअरच्या माध्यमातून काही युजर्सच्या फोनमध्ये 'घुसखोरी' झाल्याच्या वृत्ताला व्हॉट्सअॅपनं दुजोरा दिला आहे. त्यामुळे भारतासह अनेक देशात राग आणि चिंता व्यक्त होत आहे.


अनेक देशांत तिथल्या सरकारवर टीका केली जात आहे. हे सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या इस्रायलच्या NSO ग्रुपनुसार त्यांनी पेगासिस हे सॉफ्टवेअर आपण सरकारांनाच विकत असल्याचं सांगितले आहे. या आरोपांमुळेच व्हॉट्सअॅपने NSO कंपनीवर आरोप केले आहेत. मात्र या कंपनीने हे आरोप फेटाळले आहेत, तसेच भारत सरकारनेही या प्रकरणात आपला संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

हे 'स्पायवेअर' इन्स्टॉल झाल्याची बातमी कळताच अनेक जण हे लोकप्रिय अॅप आपल्या फोनमधून काढून टाकण्याचा विचार करत आहेत. पण तज्ज्ञांच्या मते हा यावरचा उपाय नाही. मग व्हॉट्सअॅपला पर्याय काय?काही युजर्स व्हॉट्सअॅपला पर्याय शोधत आहेत. सिग्नल किंवा टेलेग्रॅमसारखे मॅसेजिंग अॅप्स अधिक सुरक्षित आणि 'एनक्रिप्टेड' असल्याची म्हटले जात आहे.

जगातल्या १८० देशांमध्ये तब्बल दीड अब्ज लोक व्हॉट्सअॅप वापरतात. भारतात या अॅपचे ४० कोटी युजर्स आहेत. इतक्या मोठ्या संख्येनं युजर्स असल्यामुळं हॅकिंग होणं शक्य आहे. त्यासाठी व्हॉट्सअॅपला दोषी धरणं फारसं योग्य नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. व्हॉट्सअॅपमधलं व्हिडिओ कॉलिंग फीचरमध्ये काही सुरक्षेच्या त्रुटी असल्यानं त्याच्या माध्यमातून या स्पायवेअरने युजरच्या फोनमध्ये नकळत प्रवेश केला. नंतर फोनच्या ऑपरेटिंग सिस्टिममधल्या त्रुटींमुळे या सॉफ्टवेअरला फोनचा पूर्ण ताबा घेता येतो.

"फोन अँड्रॉइड असो वा अॅपल, स्पायवेअरने ऑपरेटिंग सिस्टिममधील त्रुटींचा फायदा घेतला," असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. "तुमच्या हँडसेटमध्ये स्पायवेअर असेल तर तुमच्या फोनमधली प्रत्येक वाचता येणारी फाईल, संदेश, कॅमेरा किंवा माईकद्वारे आलेली गोष्ट यांना धोका आहे," असेही तंत्रज्ञांचे म्हणणे आहे.

प्रत्येक मेसेज एन्क्रिप्टेड असल्यानं व्हॉट्सअॅप हे सर्वात सुरक्षित कम्युनिकेशन अॅप असल्याचा प्रचार व्हॉट्सअॅपकडून केला जातो. याचाच अर्थ मेसेज पाठवणारी आणि मेसेज पाठवलेली व्यक्ती या दोघांनाच त्यांच्या मोबाइलवर वाचता येईल, अशा स्वरूपात हे मेसेज मिळतात.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !