म्हणून अण्णा हजारे भाजप सरकारवर कडाडले

अहमदनगर - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारविरुद्ध आंदोलन करण्यासाठी अण्णा हजारे यांनी आता दिल्लीत यावे, असे आव्हान भाजप सरकारने केले. अन् अण्णा हजारे यांनी भाजपलाच खडे बोल सुनावले आहेत. मी आता कुठल्याही आंदोलनासाठी दिल्लीत येणार नाही. त्यातच सर्वाधिक युवा कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणवणाऱ्या भाजपने माझ्यासारख्या ८३ वर्षांच्या वृद्धाला आंदोलनासाठी बोलावणे, हे दुर्दैवच आहे असा टोला अण्णांनी लगावला आहे. 

दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी हे पत्र पाठवले होते. मुळात ते पत्रच आपल्याला मिळालेले नाही असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्षांनी पत्र पाठवल्याची माहिती केवळ माध्यमांकडूनच कळाली. मला हे पत्र अद्याप मिळालेले नाही. अण्णा हजारेंनी सांगितल्याप्रमाणे, 2014 मध्ये भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न दाखवून तुमचा पक्ष सत्तेत आला. पण, जनतेच्या समस्या काही कमी झालेल्या नाहीत. 

पक्ष पाहून आंदोलन केले नव्हते - मी फकीर माणून आहे. मंदिरातील दहा बाय बारा फुटांच्या खोलीत राहतो. मी कधीही पक्ष पाहून आंदोलन केलेले नाही. मला कुठल्याही पक्षाशी काहीच देणेघेणे नाही. केवळ गाव, समाज आणि देशाच्या भल्यासाठी मी आंदोलन करत आलो आहे, असेही अण्णा हजारेंनी यावेळी स्पष्ट केले आहे.

कोणताही पक्ष सत्तेत असला तरी व्यवस्ता बदलल्याशिवाय परिवर्तन होत नाही. त्यामुळे, मी दिल्लीत येऊन काहीच फरक पडणार नाही, असे अण्णा म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचार विरोधात बोलतात. पण दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार भ्रष्टाचार करते म्हणता मग केंद्र सरकारनेच कारवाई का केली नाही, असा सवाल अण्णांनी विचारला आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !