मुंबई - राज्यात आज ११ हजार ६०७ रुग्ण बरे झाले तर १४ हजार ३६१ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.६२ टक्के झाले. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ४३ हजार १७० रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ८० हजार ७१८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३९ लाख ३२ हजार ५२२ नमुन्यांपैकी ७ लाख ४७ हजार ९९५ नमुने पॉझिटिव्ह (१९.०२ टक्के) आले आहेत. राज्यात १३ लाख ०१ हजार ३४६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३४ हजार ९०८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३३१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.१८ टक्के एवढा आहे.
आज नोंद झालेल्या एकूण ३३१ मृत्यूंपैकी २४८ मृत्यू हे मागील ४८ तासातील, तर ४७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३६ मृत्यू हे ठाणे - १२, नाशिक् ८, नागपूर -५, औरंगाबाद -३, सांगली -२, धुळे – १, हिंगोली -१, कोल्हापूर -१, लातूर -१, रायगड -१ आणि सातारा - १ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
आज २१ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट २०२० या कालावधीतील कोविड बाधित रुग्णांच्या रिकॉन्सिलिएशन प्रक्रियेत एकूण बाधित रुग्णसंख्येत ६६ रुग्णांची वाढ झाली आहे.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे.