घाबरु नका, नाशिकचे पाणी राज्याबाहेर जाऊ देणार नाही

छगन भुजबळ यांची स्पष्टोक्ती

नाशिक - गेल्या काही काळात गोदावरी खोऱ्याचे पाणी गुजरातच्या प्रकल्पांना देण्याचे प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु महाराष्ट्रातील अनेक भाग पाण्यापासून वंचित असल्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्याची तहान भागविणे आवश्यक आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याचे पाणी महाराष्ट्राच्या बाहेर न जावू देता त्याचा फायदा महाराष्ट्राच्याच जमिनीला देणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

भुजबळ म्हणाले, प्रवाही वळण योजना कळमुस्ते ही योजना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमुस्ते शिवारातील डोंगरगाव या गावाजवळील दमणगंगा खोऱ्यातील वाल नदीच्या स्थानिक नाल्यावर प्रस्तावित आहे. गोदावरी व तापी खोऱ्यातील उपलब्ध पाण्याचा पूर्णपणे वापर झाला असल्यामुळे औरंगा, अंबिका, नारपार, दमणगंगा, उल्हास व वैतरणा खोऱ्यातील नद्यांचे पाणी अरबी समुद्रात वाहून जात होते. त्यामुळे गोदावरी व तापी खोऱ्यात वळविण्याचा अभ्यास समन्वय समितीमार्फत करण्यात आला. 

त्यानुसार 19 प्रवाही वळण योजनेद्वारे 2321 द.ल.घ.फु. पाणी नाशिक जिल्ह्यातील गोदावरी खोऱ्यात उपलब्ध होणार आहे. यामध्ये कळमुस्ते ही मोठी वळण योजना असून याद्वारे दमणगंगा खोऱ्यातील 690.16 द.ल.घ.फु./ 19.54 द.ल.घ.मी.पाणी गोदावरी खोऱ्यात पाणी वळविण्याचे नियोजन असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. 

तसेच त्र्यंबकेश्वर येथील दुगारवाडीजवळ बांधण्यात येणाऱ्या कळमुस्ते धरणाचे संकल्पचित्र महिन्याभरात पूर्ण करुन शासनाला सादर करण्याची सूचना मध्यवर्ती संकल्प चित्र संघटनेच्या अधिकाऱ्यांना यावेळी भुजबळ यांनी केली.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !